३. भगवान श्रीकृष्णाची शिकवण दर्शवणारी चित्रे

श्रीकृष्णाने पित्याप्रमाणे ‘कराग्रे वसते लक्ष्मी…’ या श्लोकापासून दिनचर्येतील आचार शिकवणे : आपण भावपूर्णरित्या हातांची ओंजळ केल्यावर त्याला कमळाप्रमाणे आकार प्राप्त होऊन आपली बोटे कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे होतात आणि हे कमळ भगवंताच्या चरणी अर्पण केले जाते.

श्रीकृष्णाने श्री गणेशाची पूजा भावपूर्णरित्या कशी करायची, हे शिकवणे : ‘श्रीकृष्णाचे सौंदर्य दैवी तेजाने नटले आहे’, असे वाटते. हे चित्र आश्रमातील ध्यानमंदिरात बसून काढलेले असल्याने येथील चैतन्यमय वातावरणात श्रीकृष्णाच्या मुखावरील (चेहेर्‍यावरील) देवत्व विशेषत्वाने प्रकट झाले आहे.

प्रत्येक दिवशी देवतेची शक्ती तिच्या तत्त्वानुसार कार्यरत असते, हे श्रीकृष्णाने दाखवणे : वारांशी संबंधित देवता आणि तिला पूरक असलेला कपड्यांचा रंग – शक्तीचा प्रवाह शुद्ध पांढरा ते पिवळा, पिवळा ते तांबूस, तांबूस ते लाल आणि शेवटी गडद लाल होऊन मारक शक्तीचे सगुण रूप धारण करत असल्याचे दाखवले.

श्रीकृष्णाने समृद्ध अशी स्वर्गभूमी दाखवून भोगभूमी आणि योगभूमी यांतील भेद लक्षात आणून देणे : त्याद्वारे श्रीकृष्णाने प्रवृत्ती मार्गाकडे नेणारी ही स्वर्गभूमी आणि निवृत्ती मार्गाकडे नेणारी हिंदूंची पुण्यभूमी, म्हणजेच योगभूमी यांतील भेद साधिकेला सांगितला.

भारतारत साजरा होणारा ‘नवरात्रोत्सव’ अन् पाश्चात्त्य देशांत साजरा होणारा ‘हॉलोविन’ यांमधील भेद : श्रीकृष्णाने प्रिय बालिका भक्तास रज-तम प्रधान आसुरी कृती अन् सत्त्वप्रधान दैवी कृती यांतील भेद आणि त्यांचे परिणाम यांविषयीचे ज्ञान साजर्‍या होणार्‍या दोन सणांच्या स्थूल अन् सूक्ष्म दर्शनाद्वारे करून दिले.


1396803048_Umakka_1_lekh5_Icon१. श्रीकृष्णासमवेत केलेल्या दैनंदिन कृती दर्शवणारी भावपूर्ण चित्रे

ईश्वर किंवा गुरु यांच्या अस्तित्वाची कोणत्याही स्वरूपातील जाणीव उत्कटतेने असणे, त्या जाणिवेच्या पोटी श्रीकृष्णासमवेत केलेल्या जीवनातील दैनंदिन कृती.

1397062426_Umakka_1_lekh3_125२. साधनेतील प्रयत्नांमधून श्रीकृष्णाने दिलेल्या अनुभूती दर्शवणारी चित्रे

स्थुलातून श्रीकृष्ण जरी काहीही करतांना दिसत नसला, तरी सूक्ष्मातून प्रत्येकात वास करून तोच सर्व कर्म करत आहे.

1397119543_Umakka_2_lekh2_125३. भगवान श्रीकृष्णाची शिकवण दर्शवणारी चित्रे

ईश्वर भक्तांसाठी सूक्ष्मातीसूक्ष्म अशा निर्गुण स्वरूपातून मंत्रमुग्ध करणार्‍या आणि सहज ओळखू शकणार्‍या सगुण रूपात अवतीर्ण होणे.

1397124860_Umakka_2_lekh4_125४. ईश्वराचे समष्टी कार्य दर्शवणारी चित्रे

न मे भक्तः प्रणश्यति ।’ म्हणजे ‘माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही.’या वचना प्रमाणे ईश्वर विविध माध्यमातून भक्तांचे रक्षण करणे.

1397211199_Umakka_2_lekh6_125५. कोणतीही सेवा श्रीकृष्णाच्या कृपेने होत असल्याच्या अनुभूती दर्शवणारी चित्रे

संगणकावर सेवा करतांना, चित्र काढतांना, प्रसार करतांना, अनोळखी व्यक्तींना सामोरे जातांना, प्रवचन करतांना श्रीकृष्णाच्या कृपेने होत असणे.

1397237243_Umakka_2_lekh15_125६. सनातनमधील काही आनंददायक घटना दर्शवणारी चित्रे

सनातनच्या साधकांना दैवी कण आढळणे, साधकांना संत बनवणे यांसारख्या दिव्य उपहारांच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण साधकांवर कृपेचा वर्षाव करणे.

1397240169_Umakka_2_lekh13_125७. प.पू. डॉक्टरांच्या संदर्भातील अनुभूती दर्शवणारी चित्रे

प.पू. डॉक्टरांच्या संदर्भात उमगलेले अवतार-रहस्य आणि श्रीकृष्णाप्रमाणे मधुराधिपती, जगन्माता, जगत्पिता असणार्‍या प.पू. डॉक्टरांची मधुर आठवण.

1418566858_P_Yoyatai_icon2८. पू. (सौ.) योया वाले यांनी रेखाटलेली श्रीकृष्णाच्या अस्तित्वाची अनुभूती देणारी भावचित्रे

भगवान श्रीकृष्णाप्रती असलेल्या अत्युच्च भावामुळे पू. (सौ.) योया वाले यांना विविध भावचित्रे स्फुरली आहेत.