दत्तजयंतीनिमित्त केलेल्या प्रसारात धर्मशिक्षणवर्गातील कृतीशील धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग !

पुणे – दत्तजयंतीच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यात धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींच्या माध्यमातून ‘दत्तजयंतीचे आध्यात्मिक महत्त्व’ या विषयावर ऑनलाईन प्रवचन घेण्यात आले. प्रवचनांच्या प्रसारसेवेत धर्मशिक्षणवर्गात नियमित येणारे भोर, नाशिक रस्ता आणि माळवाडी येथील धर्मप्रेमी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. भोर येथील श्री. गणेश सांडभोर आणि नाशिक रस्ता येथील महिला धर्मप्रेमी सौ. माधुरी काळे यांनी दत्तजयंतीनिमित्त प्रवचन घेतले. भोर येथील श्री. अशोक बारीक ग्रंथप्रदर्शन सेवेमध्ये सहभागी होते. माळवाडी येथील धर्मशिक्षणवर्गातील महिलांनी त्यांच्या गावात प्रवचनाचे आयोजन करून प्रसार करणे, आवश्यक साहित्य जमवणे, जिज्ञासूंना साधना सांगणे आदी सेवा भावपूर्ण केल्या.

 

वैशिष्ट्यपूर्ण

१. माळवाडी गावातील महिलांकडे ‘अँड्रॉइड’ भ्रमणभाषसंच नसल्याने त्यांना कोणत्याही ऑनलाईन सेवेत सहभागी होता येत नाही. तरीही धर्मशिक्षणवर्गाला नियमित जोडणार्‍या महिला प्रतिदिन शेतात गेल्यावर काम करतांना वैखरीतून नामजप करण्यासमवेतच इतरांना साधना आणि नामजप यांचे महत्त्व सांगणे, गावातील अन्य महिलांकडून उत्पादनांची मागणी घेण्याची सेवा करतात. त्यांच्यामुळे गावातील धर्मशिक्षणवर्गाला न जोडणार्‍या अन्य महिलाही नामजप करू लागल्या आहेत.

२. २५० हून अधिक धर्मप्रेमींनी या प्रवचनाचा लाभ घेतला.

३. जिल्ह्यातील १०९ धर्मप्रेमी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून, ५ धर्मप्रेमी फेसबूकच्या माध्यमातून, तर ५४ धर्मप्रेमींनी ट्विटरच्या माध्यमातून सेवा केली. ३६ धर्मप्रेमी ट्विटर ट्रेंडमध्येही (एखाद्या विषयावर घडवून आणलेली चर्चा) सहभागी झाले होते.

विशेष : धर्मशिक्षणवर्गाला नियमित उपस्थित रहाणार्‍या एका आजोबांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वतः जाऊन तेथे कोणत्या साहित्याची आवश्यकता आहे आणि ते उपलब्ध आहे ना ? ते पाहून त्याप्रमाणे साहित्य उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment