लेखिका सिल्विया ब्राउन यांनी १२ वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका पुस्तकात न्यूमोनियासारखा आजार वाढण्याची वर्तवली होती शक्यता !

लेखिका सिल्विया ब्राउन यांनी १२ वर्षांपूर्वी म्हणजेच वर्ष २००८ मध्ये लिहिलेल्या ‘एन्ड ऑफ डेज् : प्रीडिक्शन अँड प्रोफेसीज अबाउट द एन्ड ऑफ द वर्ल्ड’ या पुस्तकात वर्ष २०२० मध्ये न्यूमोनियासारख्या आजाराचा संसर्ग जगभर वाढण्याची शक्यता वर्तवली होती.

निसर्गाच्या होणार्‍या सर्वनाशाच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अमूल्य विचारधन

‘पर्यावरणात वनस्पती, मानव आणि पशू-पक्षी हे सजीव घटक आणि वायू, पाणी (जलाशय, नद्या इत्यादी) आणि भूमी इत्यादी निर्जीव घटक आहेत. पर्यावरणातील प्रत्येक घटकाला देवतासमान पुजणार्‍या हिंदु संस्कृतीमुळे ते लाखो वर्षे सुरक्षित होते.

नॉस्ट्रॅडॅमस, एडगर केस (Edgar Cayce) आणि संत यांची भविष्यवाणी

अनेक संत आणि भविष्यवेत्ते यांनीही सांगितले आहे, कालमहात्म्यानुसार भयानक आपत्काळ येणार आहे. मोठा विनाश करणारे तिसरे महायुद्ध होणार आहे. यात कोट्यवधी लोक मृत्यू पावतील. जगाची अर्धी लोकसंख्या ही पुढील आपत्काळात नष्ट होणार आहे. कितीतरी शहरेच्या शहरे नष्ट होतील.

घोर आपत्काळाविषयी द्रष्टे, संत, सप्तर्षि आणि देवता यांनी वर्तवलेली भाकिते !

मनुष्य देवाबरोबर देशालाही विसरला आहे. हा मनुष्य जणूकाही पृथ्वीवर खूप दिवस जगणार असल्यासारखा याने धनसंग्रह केला आहे.