घोर आपत्काळाविषयी द्रष्टे, संत, सप्तर्षि आणि देवता यांनी वर्तवलेली भाकिते !

तिसर्‍या महायुद्धाचे इतके स्पष्ट संकेत दिसत असतांनाही सुखाधीन जीवनात लिप्त झालेल्या आणि मी भले अन् माझे काम भले, अशी मानसिकता जपणार्‍या बहुतांश भारतियांना या संकटाचे गांभीर्य वाटत नाही. पुढील विवेचनावरून या विषयाचे गांभीर्य वाढण्यास साहाय्य होईल.

apatkal
१. द्रष्टे : चारशे वर्षांपूर्वी नॉस्ट्रॅडॉमस नामक प्रसिद्ध द्रष्टा फ्रान्समध्ये होऊन गेला. त्याने बरीच भविष्ये वर्तविली, ती तंतोतंत खरी झाली. त्याने पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धांविषयी जे सांगितले, तसेच वास्तवात घडले. त्याने तिसर्‍या महायुद्धाविषयीही सांगितले आहे, हे तिसरे महायुद्ध इतके महाभयंकर होणार आहे की, तुम्हाला पहिली दोन महायुद्धे खेळण्यासारखी वाटतील !

२. संत : प.पू. गगनगिरी महाराजांनी सांगितले होते, पुढे काळ इतका वाईट येणार आहे की, आम्हा संतांनाही वाटेल की, डोळे मिटले असते तर बरं झालं असतं ! बर्‍याच संतांनी अशाच प्रकारे सांगितले आहे.

‘नुकतेच महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांसह कर्नाटक, केरळ या राज्यांमधील काही भागांमध्ये महापुराने थैमान घातले. सध्या चालू झालेल्या आपत्काळाविषयी द्रष्ट्या संतांनी अनेक वर्षांपूर्वीच सांगून ठेवले आहे आणि तसेच आता घडतही आहे, हेच लक्षात येते. या आपत्काळाविषयी महाराष्ट्रातील एक थोर संत प.पू. गगनगिरी महाराज यांनी वर्ष १९९० मध्येच लिहून ठेवले आहे. या भीषण काळाविषयी त्यांनी काव्यपंक्तींद्वारे केलेले वर्णन त्यांच्या ‘चैतन्यलहरी’ या ग्रंथात प्रकाशित करण्यात आले आहे.

महायुद्ध, भूकंप आणि जलप्रलय होतील ।
पुराणभूमी जली जाऊनी नवीन वरती येईल ॥

समुद्रकिनारी भारतभूमी जलामाजी जाईल ।
सहा कोस जल पुढे येऊनी जलप्रलय होईल ॥

कृष्णेवरची धरणे सर्व पहा नष्ट होतील ।
तेणे योगे कृष्णा जल ते आकाशासी भिडेल ॥

श्रीशैल आणि कनकदुर्गा जलामाजि बुडतील ।
असंख्य शहरे पाण्यामाजी बुडोनिया जातील ॥

अतीव उष्णे हिम वितळोनी जल खाली येईल ।
तेणे योग अपरिमित ती जनहानी होईल ॥

विंध्य पर्वती हिमालयाचे जल येऊनि थडकेल ।
अनेक नगरे त्या योगाने जलमय ती होतील ॥

नद्यांवरची धरणे सारी तुटोनिया जातील ।
जलप्रलय तो जगावरी या, असा पहा येईल ॥

वर्ष २०१२ नंतर कधीही तिसरे महायुद्ध आरंभ होईल. हे महायुद्ध अतिशय महाभयंकर असेल. यात भारत स्वतः गोवला जाईल. अणुबॉम्बच्या साहाय्याने होणारा संहार पुष्कळ असेल. गावेच्या गावे उद्ध्वस्त होतील. तिसर्‍या महायुद्धानंतर संपूर्ण पृथ्वीची शुद्धी करावी लागेल. त्यासाठी अनेक संत सिद्ध व्हावे लागतील. याकरिता साधकांनी साधना वाढवणे आवश्यक आहे, असेही एका द्रष्ट्या संतांनी सांगितले आहे.

३. सप्तर्षि : मनुष्य देवाबरोबर देशालाही विसरला आहे. हा मनुष्य जणूकाही पृथ्वीवर खूप दिवस जगणार असल्यासारखा याने धनसंग्रह केला आहे. याला किती अहं आहे ? निसर्ग जेव्हा पृथ्वीवर खेळ करील, तेव्हा कुठला राजा माणसाला वाचवायला येणार ? डॉक्टर किंवा सैनिक वाचवू शकणार नाहीत. हे राष्ट्र राजा नाही, तर गुरुच चालवत आहेत. आपत्कालाची तीव्रता इतकी आहे की, आता देवाचे भक्तच यातून वाचू शकतात. (पू. डॉ.  उलगनाथन् यांनी केलेल्या सप्तर्षि जीवनाडीच्या वाचनातून, तिरुवण्णामलई, तमिळनाडू. (११.१२.२०१५))

४. देवता : त्सुनामी, वादळे आणि भूकंप होतील. दुनिया पेटेल. काळरात्र येईल. भारतावरही संकट येईल. अतिरेकी मोठा घोटाळा करतील. नरसंहार होईल. दिवसा डाके आणि लुटालूट होईल. जमीन ओसाड पडेल. नद्या कोरड्या पडतील. शेतांमध्ये पाणी साचेल. वीज नसेल. औषधे मिळणार नाहीत. रोगराई वाढेेल. डॉक्टर लोक हात टेकतील. चालता-बोलता मनुष्याचा प्राण जाईल.
– श्री हालसिद्धनाथदेव (श्री डोणे महाराज, जि. बेळगाव यांच्या माध्यमातून, भाकणुकीचे स्थळ : सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.)

थोडक्यात, येणार्‍या आपत्काळात जनजीवन आणि समाजव्यवस्था यांची भयावह दुर्दशा होईल.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात