नॉस्ट्रॅडॅमस, एडगर केस (Edgar Cayce) आणि संत यांची भविष्यवाणी

लोकहो, भीषण हानी घडवणार असलेल्या तिसऱ्यां महायुद्धाला तोंड देण्यासाठी तुम्ही सिद्ध आहात का ?

आण्विक अस्त्रांमुळे होणार असलेली हानी
शहरे नष्ट झाल्यावर होणार असलेली दुर्दशा

अनेक संत आणि भविष्यवेत्ते यांनीही सांगितले आहे, कालमहात्म्यानुसार भयानक आपत्काळ येणार आहे. मोठा विनाश करणारे तिसरे महायुद्ध होणार आहे. यात कोट्यवधी लोक मृत्यू पावतील. जगाची अर्धी लोकसंख्या ही पुढील आपत्काळात नष्ट होणार आहे. कितीतरी शहरेच्या शहरे नष्ट होतील. तिसऱ्यां महायुद्धाचा परिणाम पुढील ३० वर्षे जाणवेल आणि पुन्हा घडी बसण्यासाठी १०० वर्षे लागतील.
सध्याच्या जागतिक घडामोडी पहाता आपत्काळ अगदी उंबरठ्यापर्यंत आला आहे. सध्याच्या आधुनिक भारतियांचा पाश्चा्त्त्यांवर अधिक विश्वास असल्यामुळे काही पाश्चा्त्त्य भविष्यवेत्त्यांची, तसेच संतांची भाकिते पुढे दिली आहेत.

लेखात प्रसिद्ध केलेली चित्रे प्रातिनिधीक स्वरूपाची आहेत.

१. भविष्यकार नॉस्ट्रॅडॅमस यांनी केलेली भविष्यवाणी

४०० वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या नॉस्ट्रॅडॅमस या द्रष्ट्याने सांगितल्यानुसार तिसरे महायुद्ध २७ वर्षे चालेल. या काळात जगातील अनेक शहरे नष्ट होतील आणि कोट्यवधी लोक मृत्यूमुखी पडतील. आतंकवादाचा राजा’ पराभूत होईल. तिसऱ्यां महायुद्धानंतर पुढील १ सहस्र वर्षे जगात शांती नांदेल. (http:/en.wikipedia.org/wiki/The_Man_Who_Saw_Tomorrow) त्याने सांगितले की, तिसरे महायुद्ध इतके महाभयंकर होणार आहे की, तुम्हाला पहिली दोन महायुद्धे खेळण्यासारखी वाटतील !

२. एडगर केस (Edgar Cayce) यांची भविष्यवाणी

तिसरे महायुद्ध इजिप्त, लिबिया या परिसरात होईल. (http:/www.alamongordo.com/tag/edgar-cayce-prophesied-third-world-war-would-start-in-the-area-of-tunis-libya-egypt/) सध्या भारतातीलच नव्हे, तर जगभरातील आतंकवाद्यांच्या ज्या बातम्या प्रतिदिन वाचण्यात येतात, त्या तिसऱ्यां महायुद्धाची पूर्वसूचना समजून आतापासूनच युद्धासाठी शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक या सर्व स्तरांवर आणीबाणीची स्थिती समजून प्रयत्न केले, तरच तिसऱ्यां महायुद्धाच्या समाप्तीनंतर २०२३ या वर्षी हिंदु राष्ट्राची स्थापना होऊन खरोखरच चांगले दिवस’ (अच्छे दिन’) येतील; कारण त्याला साधनेचा पाया असेल !’

३. संत

अ. प.पू. गगनगिरी महाराज

पुढे काळ इतका वाईट येणार आहे की, आम्हा संतांनाही वाटेल की, डोळे मिटले असते, तर बरं झालं असतं ! बऱ्यांच संतांनी अशाच प्रकारे सांगितले आहे.

आ. द्रष्टे संत

वर्ष २०१२ नंतर कधीही तिसरे महायुद्ध आरंभ होईल. हे महायुद्ध अतिशय महाभयंकर असेल. यात भारत स्वतः गोवला जाईल. अणुबॉम्बच्या साहाय्याने होणारा संहार पुष्कळ असेल. गावेच्या गावे उद्ध्वस्त होतील. तिसऱ्यां महायुद्धानंतर संपूर्ण पृथ्वीची शुद्धी करावी लागेल. त्यासाठी अनेक संत सिद्ध व्हावे लागतील. याकरिता साधकांनी साधना वाढवणे आवश्यक आहे.

४. देवता

सुनामी, वादळे आणि भूकंप होतील. दुनिया पेटेल. काळरात्र येईल. भारतावरही संकट येईल. अतिरेकी मोठा घोटाळा करतील. नरसंहार होईल. दिवसा डाके आणि लुटालूट होईल. जमीन ओसाड पडेल. नद्या कोरड्या पडतील. शेतांमध्ये पाणी साचेल. वीज नसेल. औषधे मिळणार नाहीत. रोगराई वाढेेल. डॉक्टर लोक हात टेकतील. चालता-बोलता मनुष्याचा प्राण जाईल. – श्री हालसिद्धनाथदेव (श्री डोणे महाराज, जि. बेळगाव यांच्या माध्यमातून, भाकणुकीचे स्थळ : सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.)

महायुद्धांची वाढती तीव्रता

निसर्गाचा कोप आणि मानवाचे अस्तित्व धोक्यात !

मध्यंतरी पॅसिफिक महासागरातील बेटांच्या समूहावर ३२० किमी वेगाने वादळ आले. संयुक्त राष्ट्र संघाने हे वादळ म्हणजे तापमानवाढीचा परिणाम असल्याचे जाहीर केले. दुसऱ्यां दिवशी अटलांटिक महासागराच्या काठाला अतिवृष्टी होऊन डोंगरांवरून प्रचंड वेगाने पाणी आले आणि खालची शहरे बुडाली. त्यात शेकडो लोक मृत्यूमुखी पडले. चिलीमध्ये प्रचंड वणवे लागले.

प्रार्थना !

या विशेषांकाद्वारे प्रत्येक जिवाला आपत्काळाची भीषणता लक्षात येऊन सर्वांची जागृती करण्यासाठी त्याने कृतीशील व्हावे, तसेच महाभयंकर आपत्काळातून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रत्येकाने साधना आणि धर्माचरण करण्यास प्रवृत्त व्हावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना ! – संपादक

दुसऱ्यां महायुद्धातील दयनीय स्थिती

सुनामी

दुसऱ्यां महायुद्धाच्या वेळी जर्मनीने ब्रिटनविरुद्ध युद्ध पुकारले. ब्रिटनमध्ये ४ दिवसांतच १३ लाख लोकांचे स्थलांतर करावे लागले. युद्धकाळात प्रकाशबंदीही चालू झाली. बाहेर रस्त्यावर अगदी मिट्ट काळोख असायचा. खिडकीतून वा दारातून अंधुकसा प्रकाशसुद्धा बाहेर आला, तरी दंड व्हायचा ! इतकी कडक प्रकाशबंदी एक-दोन दिवस किंवा मास (महिने) नाही, तर जवळजवळ पाच वर्षे होती ! दुसऱ्यां महायुद्धाच्या काळात जर्मनीने रशियालाही कोंडीत पकडल्याने रशियन जनतेवर झाडपाला, लाकडाच्या भुशाचे केक असे पदार्थ खाऊन पोट भरण्याची पाळी आली होती !

रेल्वे बॉम्बस्फोट

आज भारत तिसऱ्यां महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभा !

जिहादी आतंकवाद्यांच्या माध्यमातून पाकिस्तानचे भारताविरुद्ध छुपे युद्ध गेल्या दोन दशकांहून अधिक काळ चालू आहे. पाकने स्वतःची युद्धसज्जता गेल्या काही वर्षांत अनेक पटींनी वाढवली आहे. चीनने तर भारताला गिळंकृत करण्यासाठी सीमाभागात रस्त्यांचे जाळेही विणले आहे. थोडक्यात युद्ध अटळ आहे !

अतिवृष्टि: अनावृष्टि: शलभा मूषका: शुका: ।
स्वचक्रं परचक्रं च सप्तैता ईतय: स्मृता: ॥ – कौशिकपद्धति

अर्थ : धर्मपालन न केल्यामुळे अतीवृष्टी, अनावृष्टी, टोळधाड, उंदीर आणि पोपट यांचा उपद्रव, आपापसांत लढाया आणि शत्रूचे आक्रमण अशी सात प्रकारची संकटे येतात. प्रजा आणि राजा धर्मपालक अन् साधना करणारे असल्यासच आपत्काळाची तीव्रता अल्प होईल किंवा तो सुसह्य होईल.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

1 thought on “नॉस्ट्रॅडॅमस, एडगर केस (Edgar Cayce) आणि संत यांची भविष्यवाणी”

Leave a Comment