लेखिका सिल्विया ब्राउन यांनी १२ वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका पुस्तकात न्यूमोनियासारखा आजार वाढण्याची वर्तवली होती शक्यता !

Article also available in :

बीजिंग – लेखिका सिल्विया ब्राउन यांनी १२ वर्षांपूर्वी म्हणजेच वर्ष २००८ मध्ये लिहिलेल्या ‘एन्ड ऑफ डेज् : प्रीडिक्शन अँड प्रोफेसीज अबाउट द एन्ड ऑफ द वर्ल्ड’ या पुस्तकात वर्ष २०२० मध्ये न्यूमोनियासारख्या आजाराचा संसर्ग जगभर वाढण्याची शक्यता वर्तवली होती. तसेच त्यांनी या पुस्तकात म्हटले आहे की, या आजाराचा संसर्ग जेवढ्या वेगाने पसरणार आहे, तेवढ्याच वेगाने हा आजार दूर होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे सिल्विया ब्राउन यांनी पुस्तकात वर्णन केलेल्या आजाराची लक्षणे ही सध्या चीनमधून जगभरात पसरलेल्या ‘कोरोना’ संसर्गाच्या लक्षणांशी मिळतीजुळती आहेत. कोरोनाचा संसर्ग वर्ष २०२० च्या प्रारंभी वेगाने वाढू लागला आहे.

त्या आधीही ४० वर्षांपूर्वी म्हणजे वर्ष १९८१ मध्ये डीन कोन्टोज यांनी लिहिलेल्या ‘द आयज् ऑफ डार्कनेस’ या पुस्तकात ‘वुहान-४००’ या विषाणूचा उल्लेख केला होता.

 

फ्रेंच भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडेमस यांनी ४६५
वर्षांपूर्वी ‘कोरोना’ विषाणूच्या संकटाविषयी वर्तवले होते भविष्य !

ज्योतिषशास्त्राला थोतांड म्हणणारे तथाकथित पुरो(अधो)गामी, बुद्धीजीवी यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

फ्रान्समध्ये जन्मलेले फ्रेंच भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडेमस यांनी कोरोना विषाणूसंबंधी भविष्य वर्तवले होते. ‘जागतिक स्तरावरील महापूर, आगीच्या घटना यांसह कोरोना विषाणूचे संकट येईल’, असे ट्वीट एक विदेशी नागरिक मार्को मलाकारा यांनी केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी पुढे म्हटले आहे की, २१ व्या शतकात महारोगाने पाऊल ठेवले आहे. ही घटना नॉस्ट्रॅडॅमस यांच्या भविष्यवाणींपैकी एक आहे. आपण मृत्यूच्या अगदी जवळ आहोत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment