हनुमान जयंती निमित्त पुणे येथे सनातन संस्थेच्या वतीने आयोजित विविध उपक्रमांना समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद !

हनुमान जयंतीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यामध्ये फलक प्रसिद्धी, सामूहिक नामजप आणि मारुति स्तोत्र पठण, प्रवचन तसेच ठिकठिकाणच्या मारुति मंदिरात ग्रंथ, सात्त्विक उत्पादनांचे कक्ष, फ्लेक्स प्रदर्शन लावणे, असे विविध उपक्रम राबवण्यात आले.

जामनगर (गुजरात) येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. हितेश जानी यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला भेट !

जामनगर (गुजरात) येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आणि गुजरात आयुर्वेद विद्यापीठाचे माजी मुख्यध्यापक तथा पंचकर्म विभागाचे प्रमुख डॉ. हितेश जानी यांनी ३१ मार्चला येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

गुढीपाडव्‍यानिमित्त गोवा दूरदर्शनवर सनातनच्‍या साधिका सौ. समृद्धी गरुड यांची मुलाखत

गोवा दूरदर्शनवर गुढीपाडव्‍याच्‍या निमित्ताने आयोजित करण्‍यात आलेल्‍या कार्यक्रमात सनातन संस्‍थेच्‍या साधिका सौ. समृद्धी गरुड यांची मुलाखत घेण्‍यात आली. या मुलाखतीत सौ. गरुड यांनी गुढीपाडव्‍याविषयी सविस्‍तर माहिती दिली.

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्‍थेचा आश्रम पाहून जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय !

‘सनातन धर्म शिकवण्‍यासाठी संस्‍थेद्वारे अत्‍याधुनिक पद्धतींचा उपयोग केला जात आहे’, हे पाहून पुष्‍कळ चांगले वाटले. माहितीजालाच्‍या (इंटरनेटच्‍या) काळात सनातन धर्माचा प्रसार अधिकाधिक लोकांपर्यंत करता येऊ शकतो.

सनातन संस्थेच्या वतीने अयोध्येतील भव्य श्रीराममंदिरातील मूर्तीसाठी आणलेल्या शाळीग्राम शिळेचे भावपूर्ण पूजन !

अयोध्येत भव्य श्रीराममंदिर उभारण्यात येत आहे. या मंदिरात साडेपाच फूट उंचीची उभ्या मुद्रेतील श्रीरामाची मूर्ती असणार आहे. ही मूर्ती साकारण्यासाठी लागणारी शाळीग्राम शिळा नेपाळ येथील गंडकी नदीतून आणण्यात आली.

कोपरखैरणे येथील सनातनच्‍या साधिका सौ. तनुजा यादव यांचा महिला दिन निमित्त गौरव !

या वेळी सौ. तनुजा यादव यांसह विविध क्षेत्रांतील कर्तृत्‍ववान महिलांचा सन्‍मानचिन्‍ह देऊन सन्‍मान करण्‍यात आला. नवी मुंबई महानगरपालिकेच्‍या अतिरिक्‍त आयुक्‍त श्रीमती सुजाता ढोले यांच्‍या हस्‍ते या कार्यक्रमाचे उद़्‍घाटन झाले.

पुणे येथे सनातन संस्थेकडून श्री गजानन महाराज प्रकटदिन निमित्त ग्रंथ प्रदर्शन !

श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त १३ फेब्रुवारी या दिवशी पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

अमेरिका येथे सनातनच्या बालसाधिकेचे शाळेत ‘भरतनाट्यम्’चे सादरीकरण !

इयत्ता चौथीमध्ये शिकणारी सनातनची बालसाधिका कु. ईश्वरी कुलकर्णी (वय ९ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) हिने या उपक्रमात ‘भरतनाट्यम्’वर आधारित ‘नमो नमो भारताम्बे’ या भारतमातेच्या संस्कृत गाण्यावर नृत्य करून उपस्थितांची मने जिंकली.

महाशिवरात्री निमित्त पुणे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादन यांचे प्रदर्शन !

महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेने जिल्ह्यात अनेक शिवमंदिरांमध्ये ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहिल्‍यावर मान्‍यवरांनी दिलेले अभिप्राय

‘समाधान आणि आत्मिक आनंद मिळाला. खूपच छान वाटले.’ – अधिवक्‍ता चारुदत्त कळवणकर, भाजप नगरसेवक तथा नंदुरबार नगर परिषद विरोधी गटनेते, जयवंत चौक, नंदुरबार.