कोल्हापूर येथील भाजपचे प्रदेश सहसंयोजक सुमित ओसवाल यांची सनातनच्या रामनाथी आश्रमाला सदिच्छा भेट !

डावीकडून सौ. काजल ओसवाल, श्री. कृष्णात जाधव आणि श्री. सुमित ओसवाल

रामनाथी : कोल्हापूर येथील भाजपचे प्रदेश सहसंयोजक श्री. सुमित अ. ओसवाल यांनी त्यांच्या पत्नी सौ. काजल आणि त्यांचे मित्र श्री. कृष्णात जाधव यांच्यासह २१ सप्टेंबर या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमाला सदिच्छा भेट दिली. त्यांनी पूर्ण आश्रम पाहिला. त्यांना आश्रमात चालणार्‍या राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याविषयी श्री. प्रकाश जोशी यांनी माहिती सांगितली. त्यांनी जिज्ञासेने आश्रमातील कार्य जाणून घेतले.

आश्रम पाहिल्यावर श्री. सुमित म्हणाले, आश्रम अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे. साधक शांत आणि मनमिळावू आहेत. आश्रम पहाणे हा एक छान मोठा अनुभव होता. सौ. काजल म्हणाल्या, आश्रम म्हणजे भेट द्यावी अशी शांत जागा आहे. मला परत आश्रमात येऊन काही दिवस रहायला आवडेल. साधक खूपच मनमिळावू आहेत. एवढे की त्यांनी आमच्या हृदयात जागा केली. श्री. कृष्णात जाधव म्हणाले, आश्रमात प्रसन्न आणि उत्साही वाटले. या ठिकाणची स्वच्छता सुंदर आहे. राष्ट्र आणि धर्म याचे साधक करत असलेले कार्य पाहून फार छान वाटले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment