मलेशियाच्या राजवटीवर असलेला भारतीय (हिंदु) संस्कृतीचा प्रभाव !
ऐतिहासिकदृष्ट्या पाहिल्यास दक्षिण-पूर्व आशिया भागावर प्राचीन भारतीय संस्कृतीचा पगडा होता. त्यामुळे थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, फिलिपीन्स, कंबोडिया, व्हिएतनाम यांसारखी असंख्य अधिराज्ये समृद्ध झाली
