विज्ञानयुगात परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यासारखे जगद्गुरु सर्व जगाचे अज्ञान नष्ट करण्यासाठी अवतरले आहेत ! – प.पू. ईश्‍वरबुवा रामदासी

ज्यांना सूर्य आणि सागर यांची उपमाही अल्प पडावी, असे परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत, असे भावपूर्ण उद्गार भाळवणी (विटा) येथील संत प.पू. ईश्‍वरबुवा रामदासी उपाख्य प.पू. दादा महाराज यांनी काढले.

‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ ग्रंथाचे ज्येष्ठ समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर यांच्या हस्ते प्रकाशन

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जीवनावर आधारित ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाचे पुणे येथील ज्येष्ठ समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले.

ज्ञानेश्वरादी भावंडांचा ब्राह्मणांनी छळ केला, हे धादांत खोटे ! – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

ब्राह्मणांनी ज्ञानेश्वरादी भावंडांना अन्नच नव्हे, पाणीही मिळू दिले नाही. त्यांचा भयानक छळ केला. त्याचे अगदी पुसटसे प्रतिबिंबही ज्ञानेश्वरी अथवा त्यांच्या अभंगादी वाङ्मयात का उमटले नाही ?

सनातन संस्था आणि हिदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगली येथील पू. पारसनाथजी महाराज आणि श्री त्रिशुलभारतीगुरुजीवनभारती महाराज यांची सदिच्छा भेट

सांगली बत्तीस शिराळा येथील श्री गोरक्षनाथ मंदिराचे मठाधिपती पू. पारसनाथजी महाराज, तसेच वाळवा तालुक्यातील मौजे जक्राईवाडी येथील श्री त्रिशुलभारती गुरु जीवनभारती महाराज यांची सनातन संस्थेचे साधक श्री. शंकर नरुटे आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. भरत जैन यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांनी गायलेली भजने

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांनी गायलेली चैतन्यमयी भजने आता आपण ऐकूया !

भाग्यनगर येथील ‘सेंटर फॉर सेल्युलर अ‍ॅण्ड मॉलिक्युलर बायोलॉजी’ या संशोधन केंद्रातील वरिष्ठ प्रमुख वैज्ञानिक डॉ. जगन्नाधम् यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

“सनातन समाजाला वेदांतातील तत्त्वांनुसार जीवन जगायला शिकवत आहे. आश्रमातील साधकांमध्ये ही तत्त्वे रुजली आहेत, हे जाणवत आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी याच प्रतिकृतीचे (‘मॉडेल’चे) रोपण आता समाजात विविध ठिकाणी केले की झाले.’’

गुणसंवर्धन

व्यक्तिमत्त्व विकास करणे म्हणजे स्वतःत गुणांची वृद्धी करणे होय ! गुणांच्या विकासामुळे व्यक्ती सर्वगुणसंपन्न होऊन तिची ईश्‍वराकडे वाटचाल होऊ लागते.

प्रापंचिक कर्तव्ये निरपेक्षतेने करतांना अखंड ईश्‍वरी अनुसंधानात रहाणार्‍या कोल्हापूर येथील श्रीमती आशा दर्भेआजी (वय ८८ वर्षे) सनातनच्या ७१ व्या संतपदी विराजमान !

अखंड ईश्‍वराच्या अनुसंधानात रहाणार्‍या आणि प्रापंचिक दायित्व निरपेक्षतेने पार पाडून संसारही साधना म्हणून करणार्‍या श्रीमती आशा दर्भेआजी (वय ८८ वर्षे) यांनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून संतपद प्राप्त केल्याची आनंदमय घोषणा ९ नोव्हेंबर या दिवशी येथील सनातनच्या आश्रमात पार पडलेल्या एका भावसोहळ्यात करण्यात आली.