पावसाळ्यात उगवणार्या रानभाज्या प्रतिकारशक्ती वाढवणार्या आहेत ! – वैद्य मुक्तेश्वरी पाखरे
कोकणातील रानमाळावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात रानभाज्या उगवतात. अत्यंत चविष्ट आणि निसर्गाची देणगी असलेल्या या औषधी रानभाज्या कोरोना प्रादुर्भावाच्या विरोधात लढण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्यास अत्यंत उपयुक्त आहेत, अशी माहिती येथील वैद्य मुक्तेश्वरी पाखरे यांनी दिली.
