धर्म आणि अध्यात्म यांची सर्वांगसुंदर माहिती देणारे, हिंदु पंचांगावर आधारित एकमेव ‘सनातन पंचांग 2020’ अ‍ॅप सर्वांसाठी उपलब्ध !

७ भाषांतील ५ लाखांहून अधिक लोकांची पसंती लाभलेले लोकप्रिय ‘अ‍ॅप’ आजच डाऊनलोड करा !

पंचांग आणि मुहूर्त यांसह सण-व्रते, धर्मशिक्षण, राष्ट्र-धर्म रक्षण आदी विविध विषयांची सर्वांगसुंदर माहिती देणारे ‘सनातन पंचांग 2020’ हे अ‍ॅप नुकतेच लाँच करण्यात आले आहे. आयुर्वेद, उपचारपद्धती, अध्यात्म, हिंदु राष्ट्र आदींच्या वैविध्यपूर्ण माहितीने नटलेले हे अ‍ॅप सर्वसामान्य हिंदूंना दैनंदिन जीवनात मार्गदर्शक असल्याने त्याचा हिंदु समाजाने लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. तिथी, दिनांक, दिनविशेष या वैशिष्ट्यपूर्ण ‘व्हिजेट’सह हे ‘अ‍ॅप’ ‘गूगल प्ले’द्वारे उपलब्ध करण्यात आले आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या भाषांमध्ये, तसेच Android आणि Apple iOS या दोन्ही ‘प्लॅटफॉर्म्स’वर सनातन पंचांग अ‍ॅप उपलब्ध आहे.

 

‘सनातन पंचांग 2020 अ‍ॅप’ ची वैशिष्ट्ये

१. दिनदर्शिका, मुहूर्त, पंचांग, सण-व्रते यांची एका क्लिक मध्ये सोप्या आणि सुलभ शब्दांत माहिती !

२. राष्ट्र आणि धर्मप्रेम जागृत करणारी संत, राष्ट्रपुरुष आणि क्रांतीक्रारक यांच्या महान कार्याची माहिती !

३. सुदृढ आरोग्यासाठी आयुर्वेद, विकारांच्या निर्मूलनासाठी लाभदायी ठरणार्‍या उपचारपद्धती यांची माहिती !

४. गणेशोत्सव, गुढीपाडवा आदी सण धर्मशास्त्रानुसार कसे साजरे करावेत, याची माहिती देणारे व्हिडिओ !

५. अध्यात्म, धर्म, संस्कार, आहार, आयुर्वेद आदी सनातनच्या बहुमोल ग्रंथसंपदेविषयक माहिती !

६. पाच लाखांहून अधिक लोकांच्या विश्‍वासाचे आणि पसंतीचे पंचांग अ‍ॅप !

 

अ‍ॅप ‘डाऊनलोड’ करण्याच्या लिंक्स :  (QR code attach केले आहेत.)

Android : http://bit.ly/sanatan- panchang-2020-all-languages


iOS : http://bit.ly/sanatan- panchang-2020-iOS-all- languages

आपला नम्र,

चेतन राजहंस
सनातन संस्था.

Leave a Comment