फेसबूककडून आता हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदी’ पानही बंद !

फेसबूककडून हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदु अधिवेशन’, तसेच ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे ‘सनातन प्रभात’ आणि सनातनचे ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादनांची विक्री करणारे ‘सनातन शॉप’ ही फेसबूक पाने बंद करण्यात आल्यानंतर या संदर्भात हिंदु जनजागृती समिती, सनातन प्रभात आणि सनातन संस्था यांच्याकडून पत्रे पाठवण्यात आली आहेत; मात्र याविषयी फेसबूककडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.

युवकांनो, स्वातंत्र्यापूर्वीच्या क्रांतिकार्यातील युवकांचा आदर्श घ्या !

भारताला स्वतंत्र करण्यासाठी ज्या राष्ट्रप्रेमाने युवक भारित झाले होते, तशाच तळमळीने आणि प्रेरणेने युवक राष्ट्रहितासाठी सर्वस्व झोकून देऊन प्रयत्न केले, तर भारत पुनश्‍च वैभवाच्या शिखरावर जाण्यास वेळ लागणार नाही ! यासाठी स्वातंत्र्यपूर्वकाळातील देशकार्याला वाहून घेतलेल्या युवकांची गुणवैशिष्ट्ये जाणून घेणे आवश्यक आहे !

पुणे येथील सनातनच्या ६७ व्या संत पू. (श्रीमती) प्रभा व्यंकटेश मराठेआजी (वय ८४ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

सनातनच्या ६७ व्या संत पू. (श्रीमती) प्रभा व्यंकटेश मराठेआजी (वय ८४ वर्षे) यांचा रविवार, वैशाख कृष्ण पक्ष एकादशी (६ जून २०२१) या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांचा साधनाप्रवास त्यांच्याच शब्दात येथे पाहूया !

प्रारब्ध

भक्त, संत आणि ईश्वर, अध्यात्म आणि अध्यात्मशास्त्र, चार पुरुषार्थ अशा विविध विषयांवर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून पू. अनंत आठवले यांनी सोप्या भाषेत उलगडलेले ज्ञान येथे देत आहोत. यातून वाचकांना अध्यात्मातील तात्त्विक विषयाचे ज्ञान होऊन त्यांच्या शंकांचे निरसन होईल आणि ते साधना करण्यास प्रवृत्त होतील.

कर्नाटकमधील कोडी मठाचे श्री शिवानंद शिवयोगी राजेंद्र श्री यांची भविष्यवाणी !

कोरोनाचे संकट अजून १० वर्षे रहाणार आहे. २० जून या दिवशी कोरोनाची दुसरील लाट अल्प होणार आहे; मात्र नंतर तिसरी लाट येणार आहे. ती भयानक असणार आहे. लोक कोट्यवधी लोक रस्त्यावर रक्ताच्या उलट्या करून मरतील.

‘हिंदु राष्ट्राचे आदर्श संघटक’ होण्यासाठी स्वतःमध्ये अर्जुनाप्रमाणे कृतज्ञताभाव निर्माण करा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

स्वसुखांच्या पलिकडेही आपले जीवन आहे. राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात आता खारीचा वाटा नाही, तर सिंहाचा वाटा उचलण्याची वेळ आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज होते; म्हणून आपण आज ताठ मानेने जगू शकत आहोत. आपण धर्माचे कार्य केवळ भगवंताची कृपा आणि ईश्वरी अधिष्ठान यांद्वारे करू शकतो.

रामनाथी (गोवा) आणि देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात ‘ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर’ची तातडीने आवश्यकता !

रामनाथी आणि देवद येथील सनातन आश्रमामध्ये राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य नि:स्वार्थीपणे करणारे अनेक साधक रहातात. यातील काही रुग्ण साधकांसाठी वेळोवेळी ऑक्सिजनची आवश्यकता भासते. त्यामुळे आश्रमात एखाद्या रुग्ण साधकाला तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी ‘ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर’ असणे अत्यावश्यक आहे.

युवकांनो, आदर्श हिंदु संघटक बनण्यासाठी लहान वयातच साधना करून धर्माचे रक्षण करा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

कोरोना संसर्गासह नैसर्गिक आपत्ती येण्यासही आता प्रारंभ झालेला आहे. यासमवेतच आपण तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर पोचलो आहोत. या भीषण आपत्काळात जीवंत रहाण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे. शिबिरात सहभागी झालेल्या युवकांना लहानपणापासूनच साधना समजली आहे, हे कौतुकास्पद आहे. अनेक संत आणि क्रांतीकारक यांनी लहान वयातच साधना करून धर्माचे रक्षण केले आहे, तसेच आपल्याला हिंदूसंघटन करायचे आहे.

मंगळ ग्रहाचा २ जून २०२१ या दिवशी होणारा कर्क राशीत प्रवेश आणि त्या कालावधीत होणारे परिणाम

‘बुधवार, २.६.२०२१ (वैशाख कृष्ण पक्ष अष्टमी) या दिवशी सकाळी ६.५१ वाजता मंगळ हा ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे. (कर्क राशीतील मंगळ अशुभ (नीच राशीत) मानला आहे.) मंगळ हा ग्रह एका राशीत दीड मास रहातो. या दीड मासातील पहिल्या आठ दिवसांमध्ये अधिक परिणामकारक फळ मिळते.

हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदू अधिवेशन’, तसेच ‘सनातन प्रभात’ आणि ‘सनातन शॉप’ यांच्या पानांवर बंदी !

हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदू अधिवेशन’, ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे ‘सनातन प्रभात’ आणि सनातनच्या सात्त्विक उत्पादनांची विक्री करणारे ‘सनातन शॉप’ ही फेसबूक पाने फेसबूककडून बंद (अनपब्लिश) करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे ‘सनातन प्रभात’ आणि ‘सनातन शॉप’ यांची पाने पूर्णतः काढून टाकण्यात आली आहेत. याविषयीची कोणतीही कल्पना किंवा कारण फेसबूककडून हिंदु जनजागृती समिती किंवा सनातन प्रभात यांना देण्यात आलेले नाही.