टक्कल पडणे
- इंद्रलुप्त (चाई) किंवा टक्कल : कडू पडवळाच्या (पटोल) पाल्याचा रस चोळावा.
- गुंजेचे मूळ बिब्याच्या रसात उगाळून लेप लावावा.
- गुंजा मधात अगर तुपात उगाळून लावाव्या.
- गुंजा, हस्तिदंताची राख आणि रसांजन यांचा लेप लावावा.
- जास्वंदाचे फूल गोमूत्रात वाटून लावावे किंवा जास्वंदाच्या फुलांनी किंवा पाला वाटून सिद्ध केलेला लेप लावावा.
- जेष्ठमध, गुंजा, मनुका, तिळाचे तेल आणि बकरीचे दूध एकत्र करून त्याचा टक्कलावर लेप लावावा.
घाम येणे
घामाला वास येत असल्यास
कुष्ठ चूर्ण, जांभळाची पाने आणि अर्जुनाची साल यांचे वस्त्रगाळ चूर्ण करून अंगाला मसाज करावा.
जास्त घाम येत असल्यास
कुळथाचे पीठ अंगास चोळावे.
घाम बंद होण्यास
भाजलेले चणे, ओवा आणि वेखंड यांचे चूर्ण अंगाला चोळावे.
केस पिकणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे आणि वृद्धावस्था लवकर येऊ न देण्यासाठी उपयोगी रसायन
अश्वगंधा
तारुण्यपिटिका
- अर्जुनाची साल दुधात वाटून लेप लावावा.
- जुनी तिळाची पेंड गोमूत्रात कालवून लेप लावावा.
- तारुण्यपिटिकेत पू आला असल्यास आंबेहळद ओली करून लावल्याने तो अलगद बाहेर पडतो.
- जायफळ उगाळून लावावे.
मुखदुर्गंधी
- केशराचा विडा तोंडात ठेवल्याने तोंडाचा दुर्गंध नाहीसा होतो.
साबण वापरणे आरोग्याला हानीकारक
अंगाला लावण्याचा साबण आपण कागदात गुंडाळून ठेवला, तर ४-५ दिवसांतच तो कागद जीर्ण होऊन फाटून जातो. साबण काही दिवस फरशीवर राहिला, तर फरशीवर पांढरे डाग पडतात. हे सर्व साबण बनवतांना वापरण्यात येणार्या कॉस्टिक सोडासारख्या हानीकारक रसायनांमुळे होते. अंघोळीसाठी नियमितपणे साबण लावल्याने त्वचेचा नैसर्गिक स्निग्धपणा निघून जातो. त्वचेला आवश्यक तो स्निग्धपणा परत मिळवण्यासाठी त्याखालील मेद, मांस, मज्जा या धातूंमधून स्नेहांश (तेलकटपणा) घ्यावा लागत असल्याने या धातूंचा स्नेहांशही न्यून होतो. यामुळे हात-पाय दुखणे, हाडे ठिसूळ होणे, चिडचिड वाढणे यांसारखे विकार निर्माण होतात. साबण वापरणे बंद केल्याने आणि अंघोळीपूर्वी त्वचेला नियमितपणे तेल लावल्याने हे सर्व विकार न्यून होऊ लागतात, असा अनुभव आहे. म्हणून निरोगी शरिरासाठी साबण न लावणेच इष्ट होय. साबणापेक्षा डाळीचे (उदा. हरभरा डाळ किंवा मसूर डाळ यांचे) पीठ अथवा वारुळावरची किंवा चांगल्या जागेवरील चाळलेली माती वापरणे चांगले आणि स्वस्तही आहे. हे नसल्यास काही न लावता नुसतेच अंग चोळून धुतले, तरी चालते.
– वैद्य सुविनय दामले, कुडाळ यांच्या मार्गदर्शनातून संकलित (२७.५.२०१४)
(टीप : ज्यांना काही कारणास्तव अंगाला साबण लावूूून अंघोळ करायची असेल, त्यांनी आयुर्वेदीय घटक असलेला साबण अल्प प्रमाणात वापरण्यास आडकाठी नाही. साबण वापरतांना त्वचेवरील तेलकटपणा पूर्णपणे निघून जात नाही ना, याकडे लक्ष द्यावे. )

सतत येणाऱ्या शिंका पासून त्रस्त आहात ?
पोटदुखी आणि पाणी
केवळ २ वेळाच आहार घेण्याची आरोग्यदायी सवय अंगी बाणवण्यासाठी हे करा !
‘पुरेसा आहार घेऊनसुद्धा गळून गेल्यासारखे किंवा शक्तीहीन झाल्यासारखे वाटणे’ यावर आयुर्वेदातील प्राथमिक उपचार
‘हँड, फूट अँड माऊथ’ (हात, पाय आणि तोंड) या साथीच्या रोगावर आयुर्वेदातील प्राथमिक उपचार
पावित्र्याचे प्रतीक असलेले श्रीफळ, म्हणजेच नारळ !