आयुर्वेदानुसार महामारीची कारणे आणि उपाययोजना !

महामारी म्हणजे अनेक लोकांना तथा जनसमुदायाला मृत्यूमुखी पाडण्यासाठी गंभीर स्वरूप धारण केलेला आजार किंवा व्याधी. गावांत, जिल्ह्यांत, राज्यांत, देशात किंवा भूखंडात रहाणार्‍या सर्वच लोकांना अशा व्याधीस सामोरे जावे लागते. कोणताही आजार किंवा व्याधी यांच्या कारणांची विभागणी साधारण तथा असाधारण या दोन वर्गांत केली जाते.

आनंदी जीवनासाठी आयुर्वेद समजून घ्या !

जागतिक आरोग्य संघटनेचीही आरोग्याविषयीची व्याख्या केवळ ‘रोग नसणे म्हणजे आरोग्य’ अशी नसून सर्वतोपरी म्हणजेच ‘शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य, म्हणजे सुखसंवेदना अनुभवण्याची अवस्था म्हणजे आरोग्य’, अशी आहे.

आयुर्वेद – अनादी आणि शाश्‍वत मानवी जीवनाचे शास्त्र

आयुर्वेद म्हणजे आयुष्याचा वेद किंवा मानवी जीवनाचे शास्त्र. त्यात शारीरिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक स्वास्थ्य कसे राखावे याचे मार्गदर्शन केले आहे. आयुष्याला हितकर व अहितकर आहार, विहार व आचार यांचे विवेचन केलेले आहे मानवी आयुष्याचे ध्येय व खरे सुख कशात आहे याचाही विचार केलेला आहे.