प्रापंचिक कर्तव्ये निरपेक्षतेने करतांना अखंड ईश्वरी अनुसंधानात रहाणार्या कोल्हापूर येथील श्रीमती आशा दर्भेआजी (वय ८८ वर्षे) सनातनच्या ७१ व्या संतपदी विराजमान !
अखंड ईश्वराच्या अनुसंधानात रहाणार्या आणि प्रापंचिक दायित्व निरपेक्षतेने पार पाडून संसारही साधना म्हणून करणार्या श्रीमती आशा दर्भेआजी (वय ८८ वर्षे) यांनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून संतपद प्राप्त केल्याची आनंदमय घोषणा ९ नोव्हेंबर या दिवशी येथील सनातनच्या आश्रमात पार पडलेल्या एका भावसोहळ्यात करण्यात आली.
