महर्षींनी परात्पर गुरुदेवांचा जन्मोत्सव वैशाख मासाऐवजी चैत्र मासात करण्यास सांगितलेले कारण !

प्रतिकात्मक छायाचित्र

सप्तर्षि म्हणतात, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची जन्मतिथी वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी असून ती १ जून २०२१ या दिवशी येत असली, तरी २ मे २०२१ या दिवशी असणार्‍या परात्पर गुरुदेवांच्या उत्तराषाढा या जन्मनक्षत्राच्या दिवशी आपणास जन्मोत्सव साजरा करावयाचा आहे. यावर्षी हा जन्मोत्सव वैशाख मासाच्या ऐवजी चैत्र मासात साजरा होईल.’’

पुढे महर्षि म्हणतात, ‘‘यावर्षी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव वैशाख मासात साजरा न करता चैत्र मासात साजरा करायचा आहे. आम्हा ॠषि-मुनींचे पंचांग हे कालगतीला धरून, म्हणजेच ब्रह्मांडात होणार्‍या हालचालींना धरून असते. मनुष्याचे पंचांग भूलोकातील घडामोडी आणि त्याविषयीचा ज्योतिषविषयक इतिहास दर्शवते.

गुरुदेव हे स्वतः श्रीविष्णूचे अवतार असल्याने त्यांच्या अवतारी कार्याविषयीचे मुहूर्त ठरवणारे आम्ही ॠषि-मुनीच आहोत. आताच्या देवलोकातील अवतारी कार्याच्या ग्रहगतीला धरून देवलोकातील पंचांगाप्रमाणे आम्ही सप्तर्षि वैशाख मासाच्या ऐवजी चैत्र मासात जन्मोत्सवाचा मुहूर्त देत आहोत.’’

– सप्तर्षि, (पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी यांच्या माध्यमातून) (संदर्भ : सप्तर्षि जीवनाडी वाचन क्रमांक १७९, दिनांक ९.४.२०२१)

 

गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या कल्याणकारी स्पंदनांचा लाभ संपूर्ण पृथ्वीला व्हावा
आणि संकटकालात साधकांचे रक्षण व्हावे, यासाठीच महर्षींनी तो १ मास आधी करण्यास सांगणे !

श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

गुरुदेवांची जन्मतिथी वैशाख मासात असतांनाही महर्षींनी एक मास आधीच म्हणजे चैत्र मासात त्यांचा जन्मोत्सव साजरा करण्यास सांगितले आहे. पृथ्वीवर सध्या घोर आपत्काळ चालू आहे. आपत्काळाची तीव्रता वाढण्याआधीच गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या कल्याणकारी स्पंदनांचा लाभ संपूर्ण पृथ्वीला व्हावा आणि संकटकालात साधकांचे रक्षण व्हावे, यासाठीच महर्षींनी असे सांगितले आहे, असे मला वाटले. महर्षींच्या आदेशाचे पालन करणे, हे आम्हा साधकांचे कर्तव्य असल्याने महर्षींच्या आज्ञेप्रमाणे आम्ही गुरुदेवांचा जन्मोत्सव वैशाख मासाच्या ऐवजी चैत्र मासात साजरा करत आहोत.

– श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment