परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी सांगितलेली अमूल्य सूत्रे !

‘जिवाच्या बुद्धीला कळण्यासाठी, म्हणजे साधना किंवा ईश्‍वरप्राप्तीसाठी प्रयत्न करण्याचा बुद्धीचा निश्‍चय होण्यापुरते धर्मग्रंथांचे महत्त्व आहे; मात्र त्यानंतर ईश्‍वरप्राप्तीसाठी गुरूंचे मार्गदर्शन आणि गुरुकृपा आवश्यक असते.

विविध प्रसंगांतून प.पू. बाबांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना कारणमीमांसेच्या पलीकडे घेऊन जाणे

विविध प्रसंगांतून प.पू. बाबांनी (प.पू. भक्तराज महाराज यांनी) परात्पर गुरु डॉ. आठवले यांना कारणमीमांसेच्या पलीकडे घेऊन जाणे, त्याची काही उदाहरणे येथे दिली आहेत.

गुरूंच्या अमृतमय आणि चैतन्यमय वाणीचा, तसेच आनंद अन् शांती यांची अनुभूती देणार्‍या भजनांचा समष्टीसाठी संग्रह करणारे शिष्यरूपी प.पू. डॉक्टर !

आजही साधकांना वातावरणातील अनिष्ट शक्तींचा त्रास होत असल्यास प.पू. बाबांच्या भजनांमुळे त्यांच्यावर आध्यात्मिक उपाय होतात. इतकेच नव्हे, तर त्यांच्यातील चैतन्याचा लाभ आजही सर्व साधक घेत आहेत. केवळ प.पू. डॉक्टरांचे अथक प्रयत्न आणि कृपा यांमुळेच आम्हा सर्व साधकांना प.पू. बाबांची ही अमृतमय, चैतन्यमय, आनंद आणि शांती यांची अनुभूती देणारी भजने ऐकण्यासाठी मिळाली. यासाठी त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती थोडीच आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी देहभान हरपून केलेली गुरुसेवा

उच्च विद्याविभूषित असलेल्या प.पू. डॉक्टरांनी त्यांच्या गुरूंची, प.पू. भक्तराज महाराज यांची तन-मन-धन अर्पून परिपूर्ण सेवा केली. त्यामुळेच प.पू. भक्तराज महाराज यांनी त्यांना ‘डॉक्टर, तुम्हाला ज्ञान, भक्ती आणि वैराग्य दिले’, असे सांगितले. आम्ही अनुभवलेले त्यांचे हे शिष्यरूपातील वागणे सर्व साधकांसाठी मार्गदर्शक असल्याने येथे देण्याचा प्रयत्न करत आहोत.

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या सत्संगात श्री. अभय वर्तक यांनी अनुभवलेले अनमोल क्षण !

माझे वडील श्री. नाना वर्तक यांनी आमच्या गावात सनातनचे कार्य चालू केले. त्यांच्या समवेत श्री. बापू रावकर आणि अन्य अनेक साधक होतेे. ते मला नेहमी सनातन संस्थेविषयी सांगायचे. त्यांच्यामुळेच मी सनातन संस्थेशी जोडला गेलो.

‘न भूतो न भविष्यति’ असा प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सवाचा अपूर्व सोहळा आयोजित करून त्यांना प्रसन्न करणारे शिष्योत्तम परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले !

९ फेब्रुवारी १९९५ या दिवशी परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांचा अमृत महोत्सवाचा सोहळा इंदूर येथे आयोजित केला होता.

सुखसागर सेवाकेंद्राच्या बांधकामाची सेवा करतांना श्री. भूषण मिठबांवकर यांनी अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सर्वज्ञता आणि प्रीती !

वर्ष १९९९ ते २००० या काळात देवाच्या कृपेने मला फोंडा, गोवा येथील सुखसागर सेवाकेंद्रात रहाण्याची आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना जवळून अनुभवण्याची संधी मिळाली.

सेवेतील बारकावे शिकवून भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करायला शिकवणारे प.पू. डॉक्टर !

एखादे बांधकाम करायचे म्हटले की, त्यासाठी अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो; पण ते बांधकाम परिपूर्ण आणि भावपूर्ण केल्यासच कौशल्यपूर्ण होऊन त्यात जिवंतपणा येऊन शकतो, हे आम्हाला शिकवले, ते केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच !

शीघ्र गतीने अध्यात्मप्रसार होण्यास्तव प.पू. डॉक्टरांनी केलेली ध्वनीचित्रीकरण सेवेची निर्मिती आणि त्यातून साधकांची साधना व्हावी, यासाठी विविध माध्यमांतून दिलेली शिकवण !

दूरचित्रवाहिन्या आणि संगणकीय तंत्रज्ञान भारतात वेगाने येऊ लागले आहे, हे प.पू. डॉक्टरांच्या दृष्टोत्पत्तीस होतेच. या दृक्-श्राव्य माध्यमांचा जनमानसावरील पगडा वाढत होता. या माध्यमांद्वारे प्रसार केल्यास सर्वसामान्य व्यक्तीला कोणतेही सूत्र आकलन होण्यास आणि मनाची पकड घेण्यास सोपे जाते.

अस्वच्छता आणि अव्यस्थितपणा असेल तेथे अनिष्ट शक्तींचा प्रादुर्भाव होणे आणि प.पू. डॉक्टरांनी आश्रमातील वाईट स्पंदने दूर करण्यासाठी स्वतः स्वच्छता करणे

फोंडा आश्रमात असलेली अस्वच्छता, अव्यस्थितपणा यांमुळे तेथे अनिष्ट शक्तींचा पुष्कळ त्रास असणे आणि प.पू. डॉक्टरांनी आश्रमात सर्वत्र फिरून अस्वच्छता आणि अव्यस्थितपणा दूर करवून घेतल्याने वास्तूतील त्रास उणावणे