समाजाच्या उत्थानासाठी साधना या विषयांवरील प्रवचनांच्या ध्वनीफितींच्या निर्मितीच्या माध्यमातून यज्ञ करणारे !

वर्ष १९९० ते १९९६ या कालावधीत संस्थेच्या अध्यात्मप्रसाराचे कार्य म्हणून काही जिल्हे, तालुके आणि शहरे या ठिकाणी प.पू. डॉक्टर अभ्यासवर्ग घेत असत. पुढे वर्ष १९९७ ते १९९९ या कालावधीत प.पू. डॉक्टरांनी महाराष्ट्र, गोवा अन् कर्नाटक या राज्यांमध्ये १०० हून अधिक जाहीर प्रवचने घेतली. सर्व ठिकाणच्या प्रवचनांचे चित्रीकरण करून त्यांचे एकत्रित संकलन करण्यासाठी अडचण येऊ नये, यासाठी सर्व प्रवचनांच्या वेळी एकच झब्बा आणि पॅन्ट वापरली….

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आदर्श जीवन पद्धती !

प.पू. डॉ. आठवले प्रसिद्धीपराङ्मुख असल्याने मागील वर्षापर्यंत त्यांनी कुठल्याही अंगाने त्यांचे श्रेष्ठत्व जगजाहीर करण्यास साधकांना अनुमती दिली नाही. साधकांना प.पू. डॉक्टर यांच्यासंदर्भात शेकडो अनुभूती येऊनही प.पू. डॉक्टर त्याचे सर्व कर्तेपण श्रीकृष्णाला देऊन त्यापासून अलिप्त रहात.