कर्नाटकातील कोडी मठाकडून नववर्षाविषयी भविष्यकथन

आजपर्यंत पाहिला किंवा ऐकला नाही, असा मोठा आघात भारतावर होणार !

कोडी मठ (कर्नाटक) – नववर्षात धार्मिक दंगली, अशांती वाढणार आहे. जग आणखी अधिक संभ्रमित होणार आहे, असे भविष्यकथन कोडी मठाकडून करण्यात आले आहे. ‘नववर्ष कसे असेल ?’, ‘पीक-पाणी कसे असेल ?’, याविषयी अनेक वर्षांपासून कोडी मठाकडून भविष्यकथन करण्यात येते. या मठाचे प्रमुख श्री शिवानंद शिवयोगी राजेंद्र स्वामीजी हे भविष्यकथन करतात.या भविष्यवाणीवर अनेकांची अपार श्रद्धा आहे. ‘आजपर्यंत पाहिला-ऐकला नाही, असा मोठा आघात भारतावर होणार आहे’, असे यावर्षीच्या भविष्यकथनातून सांगण्यात आले असून लोकांना सावध करण्यात आले आहे.

कोडी मठाच्या भविष्यकथनात म्हटले आहे की,

१. राजकीय अशांतता निर्माण होईल, अनेक ठिकाणी गोंधळ माजेल, राजकीय गट पडतील, जगाचे सम्राट (देशांचे प्रमुख) संभ्रमित होतील.

२. अशांती, धार्मिक दंगली, हत्या होतील. विशेष म्हणजे विजेमुळे पुष्कळ हानी होईल.

३. आगीपासून पुष्कळ हानी होईल.

४. डोंगराळ भाग सपाट होईल, सपाट भाग डोंगराळ होईल, असे पावसाळ्यात होऊ शकेल.

५. यावर्षी पाऊस चांगला असणार आहे. अनेक ठिकाणी पूर येईल; परंतु अनेक ठिकाणी दुष्काळही पडेल.

६. जगाला वायूप्रदूषणाचा त्रास होणार आहे. भारताची राजधानी देहलीसह जगातील अनेक देशांना वायूप्रदूषणाशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे.

Leave a Comment