‘डिसीझ एक्स’ नावाची कोरोनापेक्षा ७ पटींनी अधिक घातक महामारी येणार !

जिनीव्हा (स्वित्झर्लंड) – जगभरात कोरोना महामारीने हाहा:कार माजवल्यानंतर आता अशा प्रकारची नवी महामारी येऊ शकते, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे. ही महामारी कोरोनापेक्षा तब्बल ७ पटींनी अधिक घातक असून त्यामुळे जगातील ५ कोटी लोकांचा जीव जाऊ शकतो, असा संघटनेने दावा केला आहे.

 

ब्रिटनच्या ‘वॅक्सीन टास्क फोर्स’च्या प्रमुख केट बिंघम यांनी याविषयी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेने या महामारीला ‘डिसीझ एक्स’ असे नाव दिले असून ती केव्हाही जगावर घाला घालू शकते. जर या रोगाने महामारीचे रूप घेतले, तर किमान ५ कोटी लोकांना त्यांचा जीव गमवावा लागणार आहे. वर्ष १९१८-१९ मध्ये एका महामारीमुळे अशा प्रकारे ५ कोटी लोक मृत्यूमुखी पडले होते. वैज्ञानिक या रोगाविषयी माहिती एकत्र करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

 

Leave a Comment