मुसलमान राष्ट्रे उद्ध्वस्त होतील ! – प.पू. भगवान डोणे-वाघापुरे महाराज यांची भाकणूक (भविष्यवाणी)

भाकणूक म्हणजे श्री हालसिद्धनाथ देव हा प.पू. भगवान डोणे
महाराजांच्या माध्यमातून काळाची भाकिते सांगतो तो सोहळा

पू. भगवान डोणे महाराज

मुंबई – येत्या काळात मराठी सैनिक निधड्या छातीने लढेल, पाकिस्तानचा चौथा भाग भारतात येईल, चीन भारतावर आक्रमण करील, देशात समान नागरी कायदा येईल, जगातील मुसलमान राष्ट्रे उद्ध्वस्त होतील, अशी विविध भाकिते प.पू. भगवान डोणे-वाघापुरे महाराज यांनी १५ मार्च या दिवशी पहाटे भाकणुकीत केली. सद्गुरु बाळूमामा आणि श्री हालसिद्धनाथ भंडारा सोहळ्यात भाकणुकीचा हा कार्यक्रम पार पडला. मूळक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील, कागल तालुक्यातील मेतके येथे हा सोहळा पार पडला.

सद्गुरु बाळूमामा आणि श्री हालसिद्धनाथ भंडारा सोहळ्यात भाकणुकीचा हा कार्यक्रम पार पडला

भगवा झेंडा राज्य करील !

या भाकणुकीत प.पू. भगवान डोणे-वाघापुरे महाराज पुढे म्हणाले, ‘‘सीमाभागात गोंधळ होईल. कर्नाटकातील जलाशयाला भगदाड पडेल. वैरण सोन्याची होईल. वैरण आणि पाणी यांची चोरी होईल. दीड मासाचे धान्य पिकेल. शेतकर्‍याच्या हातात गाकर आणि खांद्यावर चाबूक राहील. सामान्य माणूस आनंदात राहील. दुधाचा भाव वाढत राहील, नदीकाठची भूमी ओसाड पडेल. महागाई वाढत राहील. दागिने, पैसे मनुष्याला घातक ठरतील. ऊसदरासाठी आंदोलने होतील. भगवा झेंडा राज्य करेल. जाती-धर्मात तेढ वाढेल.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment