साधकांनो, प्रत्येक क्षण साधनेसाठीच वापरून साधनेची फलनिष्पत्ती वाढवा आणि आध्यात्मिक उन्नतीचे ध्येय शीघ्र साध्य करा !

एकदा गेलेला वेळ पुन्हा मिळवता येत नाही’, या तत्त्वानुसार साधकांनी एकही क्षण न दवडता साधनेसाठी झोकून देऊन प्रयत्न करणे अपेक्षित आहे.

संशोधनाच्या माध्यमातून संपूर्ण मानवजातीला अनमोल ठेवा उपलब्ध करून देणार्‍या ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ला छायाचित्रणासाठी (‘फोटोग्राफी’साठी) विविध उपकरणे आणि साहित्य यांची आवश्यकता !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय’ वैज्ञानिक भाषेत आध्यात्मिक संशोधन करण्याचे एकमेवाद्वितीय आणि ऐतिहासिक कार्य करत आहे. या विश्‍वविद्यालयाचे काही साधक संतांच्या मार्गदर्शनानुसार विविध ठिकाणी प्रवास करून भारतीय संस्कृतीच्या अनमोल ठेव्याचा संग्रह करत आहेत.

धरणक्षेत्रात रहाणार्‍यांनो, स्वत:च्या आणि कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी सतर्क रहा !

पावसाळा चालू झाल्यावर धरणे फुटण्याच्या घटना देशभरात कुठे ना कुठे घडत असतात. विशेष म्हणजे या धरणांच्या सुरक्षिततेचे परीक्षण करण्यासाठी स्वतंत्र शासकीय विभाग आहेत; पण या विभागांनी धरणे फुटण्यापूर्वीच जनतेला सतर्क करून हानी रोखली, असे कधी घडत नाही.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या धर्मकार्यात सहभागी होऊन स्वतःचा उद्धार करून घ्या ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

‘ऑनलाईन कोरोना महामारीच्या विरुद्ध मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर कसे लढायचे ?’ या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.

आपत्काळात आपण केवळ साधनेच्याच बळावर तरून जाऊ शकतो ! – पू. अशोक पात्रीकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

साधनेमुळे आपल्याला भगवंताचे कृपाछत्र मिळते आणि येणार्‍या आपत्काळात आपण केवळ साधनेच्याच बळावर तरून जाऊ शकतो, असे मार्गदर्शन सनातनचे संत पू. अशोक पात्रीकर यांनी नुकत्याच झालेल्या दोन दिवसांच्या ‘ऑनलाईन’ युवा साधना शिबिरात केले.

सनातनची सर्वांगस्पर्शी ५ सहस्र संख्येची ग्रंथसंपदा सर्व भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये प्रकाशित व्हावी, यासाठी ग्रंथनिर्मितीच्या व्यापक सेवेत सहभागी व्हा !

विविध भारतीय भाषांचे आणि इंग्रजीचे ज्ञान असणारे साधक, वाचक अन् हितचिंतक यांना आध्यात्मिक ज्ञानदानाच्या कार्यात सहभागी होण्याची अमूल्य संधी !

येणार्‍या भीषण आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी साधनाच करणे आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

‘येणारा काळ हा अजून कठीण असणार आहे’, असे अनेक संत, द्रष्टे यांनी सांगितलेले आहेच. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी केवळ भगवंतच आपल्याला साहाय्य करू शकतो आणि यासाठी साधनाच करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.

पूर्वसूचना न देता ‘फेसबूक’ची पाने बंद केल्याच्या कृतीला सनातन संस्थेकडून मुंबई उच्च न्यायालयात आव्हान !

‘फेसबूक’वरील पाने (पेजेस्) बंद करणे, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. ‘फेसबूक’ची ही कृती केंद्र सरकारच्या अधिकारांवर गदा आणणारी असून कायद्याच्या कोणत्याही प्रक्रियेचा अवलंब न करता भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर अंकुश ठेवणारी आहे, असे नमूद करत सनातन संस्थेने ‘फेसबूक’च्या पाने बंद करण्याच्या कृतीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले.

… तर १-२ मासांत राज्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते ! – शासननियुक्त ‘टास्क फोर्स’

महाराष्ट्रात कोरोनाच्या पहिल्या लाटेत १९ लाख, तर दुसर्‍या लाटेत ४० लाख रुग्णांची नोंद आहे. तिसर्‍या लाटेत सक्रीय रुग्णांची संख्या ८ लाखांपर्यंत जाऊ शकते.

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने केल्या जाणार्‍या वैज्ञानिक स्तरावरील संशोधनकार्यात सहभागी होऊन अध्यात्मजगताची अभिनव ओळख करून घ्या !

अनेक विषयांवर संशोधन करून हे ज्ञानभांडार अखिल मानवजातीपर्यंत पोचवणे, हे आपले धर्मकर्तव्यच आहे. या धर्मकार्यात सहभागी होऊन आपले धर्मकर्तव्य बजावा !