‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने केल्या जाणार्‍या वैज्ञानिक स्तरावरील संशोधनकार्यात सहभागी होऊन अध्यात्मजगताची अभिनव ओळख करून घ्या !

साधक, वाचक, हितचिंतक आणि संशोधक यांना नम्र विनंती !

सध्या अनेक जण संतांच्या अनुभवसिद्ध ज्ञानापेक्षा वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीवर अधिक विश्वास ठेवतात. त्यामुळे वर्ष २०१४ पासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने आधुनिक वैज्ञानिक परिभाषेत अध्यात्माचे महत्त्व सांगण्यासाठी वैज्ञानिक स्तरावर संशोधनकार्य केले जात आहे. आधुनिक वैज्ञानिक उपकरणे आणि प्रणाली यांच्या साहाय्याने नाविन्यपूर्ण संशोधन करण्यात येत आहे. या संशोधन कार्याची व्याप्ती, वैशिष्ट्ये आणि उपलब्ध सेवा पुढे देत आहोत.

 

१. संशोधन कार्याची व्याप्ती

यामध्ये हिंदु धर्मातील आचार, यज्ञ, अनुष्ठान, मंत्रपठण आदी धार्मिक कृती; देश-विदेशांतील तीर्थक्षेत्रे, संतांची समाधीस्थाने आणि ऐतिहासिक स्थळे, तसेच वाईट शक्ती आणि त्यांच्या त्रासांवरील उपाय; दैवी शक्ती अन् वाईट शक्ती यांचा दृश्य परिणाम दर्शवणारे संशोधन आणि सात्त्विक संगीत, नृत्य, वाद्यवादन आदी कलांच्या संदर्भात केले जाणारे विविधांगी संशोधन अंतर्भूत आहे.

 

२. संशोधन कार्याचे वैशिष्ट्य

या संशोधनाला पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील ज्ञानाची, म्हणजे सूक्ष्म-परीक्षणाची जोड देऊन विश्लेषण करण्यात येत आहे. त्यामुळे बुद्धीजीवी समाजावर अध्यात्माचे महत्त्व बिंबण्यास साहाय्य होते.

 

३. अखिल मानवजातीपर्यंत संशोधनकार्य पोचवण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता !

लवकरच महाभीषण आपत्काळाला आरंभ होणार आहे. त्यापूर्वीच अनेक विषयांवर संशोधन करून हे ज्ञानभांडार अखिल मानवजातीपर्यंत पोचवायचे आहे. त्यामुळे गोवा येथील रामनाथी आश्रमात विविध सेवांसाठी मनुष्यबळाची तातडीने आवश्यकता आहे. आपण आपली आवड आणि कौशल्य यांनुसार पुढील एखादी सेवा शिकू शकता. संशोधनाशी संबंधित सेवा करणार्‍यांना विविध सेवांतून अध्यात्मजगताची अभिनव ओळख होईल, तसेच ज्ञानाचा एक निराळा आनंदही अनुभवायला मिळेल.

संशोधन कार्याच्या अंतर्गत पुढील सेवा उपलब्ध आहेत.

 

४. सेवांचे स्वरूप

४ अ. वैज्ञानिक उपकरणांद्वारे केल्या जाणार्‍या संशोधनाशी संबंधित सेवा

१. ‘यू.ए.एस्.’ (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर), ‘पिप’ (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी), ‘बायो-वेल जी.डी.व्ही.’ (Bio-well GDV) आणि ‘थर्मल इमेजिंग’ या वैज्ञानिक उपकरणांद्वारे करण्यात येणार्‍या प्रयोगांतील चाचण्यांचे नियोजन करणे

२. ‘यू.ए.एस्.’ (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर), ‘पिप’ (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी), ‘बायो-वेल जी.डी.व्ही.’ (Bio-well GDV) आणि ‘थर्मल इमेजिंग’ या वैज्ञानिक उपकरणांद्वारे चाचण्या करणे

३. ‘यू.ए.एस्.’ प्रयोगांच्या अंतर्गत केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे (‘रिडिंग’चे) टंकलेखन करणे आणि ते पडताळणे

४. ‘पिप’ चाचण्यांतील ‘पिप इमेजेस’ (पिप छायाचित्रे) निवडणे आणि पिप छायाचित्रांतील स्पंदनांचे टक्केवारीत रूपांतर करून सारणी सिद्ध करणे

५. ‘थर्मल इमेजिंग’ चाचण्यांतील ‘थर्मल इमेजेस’ निवडणे

६. ‘बायो-वेल जी.डी.व्ही.’ (Bio-well GDV) चाचण्यांतील ‘रिडिंग’चे टंकलेखन करणे आणि ते पडताळणे

७. वैज्ञानिक उपकरणांद्वारे केलेल्या चाचण्यांचे (‘यू.ए.एस्.’, ‘पिप’, ‘बायो-वेल जी.डी.व्ही.’ आणि ‘थर्मल इमेजिंग’ यांचे) अहवाल (रिपोर्ट) बनवणे, त्या अहवालांचे मुद्रितशोधन करणे

८. वैज्ञानिक उपकरणांद्वारे केलेल्या चाचण्यांच्या अहवालांचे मराठीतून इंग्रजी भाषेत भाषांतर करणे, तसेच संशोधनाशी संबंधित इंग्रजी भाषेतील धारिकांचे मराठी भाषेत भाषांतर करणे

९. वैज्ञानिक उपकरणांद्वारे केलेल्या चाचण्यांचा (धारिका, इमेजेस इत्यादींचा) साठा अद्ययावत (डेटाबेस मेंटेन) करणे

४ आ. बुद्धीअगम्य घटनांचे विश्लेषण करून त्यांचे लेख सिद्ध करणे आणि त्या संदर्भात अधिक संशोधन करणे

४ इ. शोधनिबंधाच्या संदर्भातील सेवा

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने भारतातील, तसेच विदेशातील अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक संशोधनावर आधारित शोधनिबंध (रिसर्च पेपर) सादर करण्यात येतात. या अंतर्गत शोधनिबंध लिहिणे, त्याचे सादरीकरण करणे आदी सेवा उपलब्ध आहेत.

 

५. वरील सेवांसाठी आवश्यक कौशल्य

यासाठी वैज्ञानिक संशोधनाची आवड असावी. संगणकावर टंकलेखन करता यावे, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांचे व्याकरण आणि शब्दरचना यांचे किमान ज्ञान असावे, तसेच वैज्ञानिक उपकरणे हाताळता यावीत.

या सेवा करण्यास इच्छुक असल्यास; परंतु सेवेचे कौशल्य नसल्यास संबंधितांना त्या संदर्भातील प्रशिक्षण देण्यात येईल. वरील सेवा करू इच्छिणार्‍यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून पुढील सारणीनुसार आपली माहिती श्री. रूपेश रेडकर यांच्या नावे [email protected] या संगणकीय पत्त्यावर अथवा पुढील टपाल पत्त्यावर पाठवावी.

टपालासाठी पत्ता : श्री. रूपेश रेडकर, ‘भगवतीकृपा अपार्टमेंट्स’, एस्-१, दुसरा मजला, बिल्डिंग ए, ढवळी, फोंडा, गोवा. ४०३४०१

अनेक विषयांवर संशोधन करून हे ज्ञानभांडार अखिल मानवजातीपर्यंत पोचवणे, हे आपले धर्मकर्तव्यच आहे. या धर्मकार्यात सहभागी होऊन आपले धर्मकर्तव्य बजावा !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment