हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना आवाहन !

फेसबूकने हिंदु जनजागृती समिती, सनातन प्रभात नियतकालिक, सनातन शॉप यांची फेसबूक पाने बंद केली आहेत. एवढेच नव्हे, तर समितीची ३५ राज्य अथवा जिल्हास्तरीय पानेही बंद करण्यात आली आहेत. समाजामध्ये नि:स्वार्थपणे राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी अविरतपणे कार्य करणार्‍या अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्याही फेसबूक पानांवर बंदी लादण्यात आली आहे, असे लक्षात आले आहे.

या अनुषंगाने हिंदु जनजागृती समितीने सर्व हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मासाठी कार्य करणार्‍या संघटनांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारे फेसबूकने कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता त्यांच्या पानांवर बंदी आणली असेल, तर याची माहिती हिंदु जनजागृती समितीला कळवा. यासंदर्भात समिती नक्कीच आपले साहाय्य करील. माहिती पाठवतांना संघटनेचे नाव, फेसबूक पानाची लिंक (मार्गिका), सदस्य संख्या आणि संपर्क क्रमांक यांचा समावेश करावा. हिंदु जनजागृती समितीला पुढील संपर्कांवर संपर्क करू शकता :

इ-मेल पत्ता : [email protected]
संपर्क क्रमांक : ९३२२५३३५९५
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment