पुणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळाच्या
‘प्रोफाईल मेंबर्स’साठी ‘ऑनलाईन धर्मशिक्षणवर्ग वर्षपूर्ती सोहळ्या’चे आयोजन !

पुणे – कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेत ‘रेमडेसिविर’ इंजेक्शनचा काळाबाजार, डॉक्टर आणि रुग्णालये यांनी केलेली लूट या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागले. दळणवळण बंदीमुळे अनेकांच्या नोकर्या गेल्या, व्यवसाय बंद झाले, तसेच अनेकांचे प्राण गेले. त्यानंतर लगेचच ‘तौक्ते’ आणि ‘यास’ अशा दोन वादळांमुळे जनजीवन आणखी विस्कळीत झाले. ही स्थिती असतांना धर्मांध वेगवेगळ्या प्रकारचे जिहाद करत आहेत. मागील वर्षी ‘कोरोना जिहाद’मुळे कोरोना महामारी देशात पसरली. मागील मासातच मध्यप्रदेशमध्ये एक धर्मांध परिचारिका हिंदूंना इंजेक्शनमध्ये लस न भरताच सुई टोचत होती. हा ‘लस जिहाद’ आहे, असे म्हटल्यास चुकीचे ते काय ? दुसरीकडे अमेरिकेतील ख्रिश्चन संस्था हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी प्रतिवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी भारतात पाठवत आहेत. भारताला ख्रिश्चन राष्ट्र बनवण्याचे मोठे षड्यंत्र चालू आहे. हे रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे. ‘येणारा काळ हा अजून कठीण असणार आहे’, असे अनेक संत, द्रष्टे यांनी सांगितलेले आहेच. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी केवळ भगवंतच आपल्याला साहाय्य करू शकतो आणि यासाठी साधनाच करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.
गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे लागू केलेल्या दळणवळण बंदीच्या काळात हिंदु जनजागृती समितीच्या प्रोफाईल मेंबर्ससाठी ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्ग चालू करण्यात आला. या वर्गास एक वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून वर्षपूर्ती सोहळ्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !