गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावी जातांना, तसेच इतर वेळीही प्रवास करतांना शक्य असल्यास सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, लघुग्रंथ आदी समवेत ठेवून त्यांचा प्रसार करा !

गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावी जातांना, तसेच इतर वेळीही प्रवास करतांना शक्य असल्यास सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, लघुग्रंथ आदी समवेत ठेवून त्यांचा प्रसार करा !

वाहनाचा अपघात होऊ नये, यासाठी साधकांनी घ्यावयाची दक्षता आणि प्रवासात अपघात टाळण्यासाठी वापरावयाचे ‘अपघात निवारण यंत्र’ !

सध्या आपत्काळाची तीव्रता आणि अनिष्ट शक्तींची आक्रमणे वाढतच चालली आहेत. त्यामुळे साधकांच्या संदर्भात वाहनाचा अपघात होण्याचा घटना वारंवार घडत आहेत. यासाठी साधकांनी दुचाकी आणि चारचाकी वाहन चालवतांना पुढीलप्रमाणे आवश्यक ती दक्षता घ्यावी.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात लागवडीची सेवा करण्याचा अनुभव असलेले आणि शारीरिक सेवा करण्याची क्षमता असणारे यांची आवश्यकता !

सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात विविध औषधी वनस्पती, फळझाडे आणि भाजीपाला आदींची लागवड करण्यात आली आहे. त्यांची देखभाल करणे आणि नवीन लागवड करणे या सेवांसाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे.

आध्यात्मिक त्रास न्यून होण्यासाठी झोपण्यापूर्वी स्वतःभोवती संरक्षककवच निर्माण करा !

‘सध्या वातावरणात रज-तमाचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे. रात्री निद्रावस्थेत असतांना हे आवरण वाढते. तसे होऊ नये; म्हणून साधकांनी स्वतःभोवती संरक्षककवच निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी झोपण्यापूर्वी पुढील कृती करावी.

अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !

गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचा कृपाशीर्वाद आणि त्यांच्याकडून प्रक्षेपित होणारे शब्दातीत ज्ञान नेहमीच्या तुलनेत सहस्र पटींनी अधिक कार्यरत असते. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुसेवा अन् धनाचा त्याग करणाऱ्याला गुरुतत्त्वाचा लाभ सहस्रपट अधिक होतो.

‘गुरुकृपायोगा’नुसार साधनेमधील पहिला टप्पा केवळ ‘स्वभावदोष-निर्मूलन’ नसून ‘स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन’ असा आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधकांनीही स्वभावदोष-निर्मूलनासह गुण-संवर्धन प्रक्रियाही नियमित राबवावी; कारण गुण असल्याविना साधना करता येत नाही. गुणांमुळे मनोबल वाढते. गुणवृद्धी झाली की, ‘साधना करूनही प्रगती का होत नाही’, अशा प्रकारचे विचार किंवा या विचारांनी येणारी निराशाही येत नाही.

विद्यार्थी-साधकांनो, उन्हाळ्याच्या सुट्टीत चैतन्यदायी आश्रमजीवन अनुभवा आणि साधनेचे बीज अंतरात रोवून हिंदु राष्ट्रासाठी पात्र व्हा !

सर्वत्रच्या विद्यार्थी-साधकांना सनातनच्या आश्रमांत रहाण्याची अमूल्य संधी !

अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने ग्राहकांना भेट म्हणून सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ देण्यासाठी सराफी दुकानदारांना उद्युक्त करा !

सनातनची अनमोल ग्रंथसंपदा अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्याच्या दृष्टीने साधकांनी सर्वत्रच्या सराफी दुकानदारांना संपर्क करावा.

साधकांनो, ‘सतत नकारात्मक विचार करण्याने आणि त्याविषयी इतरांशी वारंवार बोलण्याने मनावर नकारात्मकतेचा संस्कार होतो’, हे लक्षात घेऊन योग्य मार्गदर्शन, तसेच स्वयंसूचना घ्या !

स्वतःच्या समस्यांविषयी विचार करत रहाण्याने, तसेच त्यांविषयी इतरांना सतत सांगितल्याने मनाला नकारात्मक स्वयंसूचना दिल्याप्रमाणे होते.

कोरोनाच्या संसर्गात निष्काळजीपणा न करता वेळेवर औषधोपचार करून प्राणरक्षणासाठी योग्य क्रियमाण वापरा !

साधकांनी सर्दी, खोकला, घसा दुखणे, अंगदुखी, कणकण, ताप, वास न येणे, जुलाब होणे, थकवा, भूक न लागणे यांसारखी कोणतीही लक्षणे आढळल्यास तातडीने औषधोपचार घेणे आवश्यक आहे.