
‘सनातनचे आश्रम म्हणजे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अविरत झटणार्या साधकांची आध्यात्मिक शाळा ! आगामी पावसाळ्याच्या दृष्टीने आश्रम आणि सेवाकेंद्रे या ठिकाणी पूर्वसिद्धता करण्यात येत आहे. आश्रम परिसरातील सर्व साहित्य सुस्थितीत रहाण्याकरता तात्पुरत्या निवारा शेड बनवायच्या आहेत. त्यासाठी फ्लेक्स, प्लास्टिक आणि ‘सिलपोलिन’ यांची, तसेच लोखंडी अन् प्लास्टिक पत्र्यांची (‘कॉरुगेटेड शीट्स’ची) आवश्यकता आहे. ‘सिलपोलिन’ किंवा फ्लेक्स पुढील आकारांत हवे आहेत.
| आश्रम / सेवाकेंद्र | आकार (चौरस फूट) |
| 1. रामनाथी | २,८०० |
| २. देवद | १,७०० |
| ३. अन्य सेवाकेंद्रे | १,२०० |
| एकूण | ५,७०० |
वाचक, हितचिंतक, तसेच धर्मप्रेमी वरील साहित्य अर्पण स्वरूपात अथवा सवलतीच्या दरात देऊ शकतात. नवीन, पूर्वी वापरलेले वा किरकोळ दुरुस्ती केल्यावर वापरण्यायोग्य होणारेे साहित्य उपलब्ध असल्यास तेही देऊ शकतात. हे साहित्य विकत घ्यायचे असल्यास ५० सहस्र रुपयांपर्यंत व्यय येेऊ शकतो. त्यासाठी धनरूपात साहाय्य करू शकत असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०
संगणकीय पत्ता : [email protected]
टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१
यासाठी धनादेश द्यावयाचा असल्यास तो ‘सनातन संस्था’ या नावाने काढावा.’
वरील साहित्य खरेदी करण्यासाठी अर्पणदात्यांना संपूर्ण रक्कम देणे शक्य नसल्यास ते आपल्या क्षमतेनुसार अर्पण करून या धर्मकार्यात योगदान देऊ शकतात.
– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था. (२९.४.२०२३)
साधकांसाठी सूचना
वरील साहित्य जिल्ह्यांत विनावापर पडून असल्यास संबंधित जिल्हासेवकांनी त्याची माहिती (आकार, नग, स्थिती इत्यादी) कळवावी. त्यानंतर ते कुठे आणि कधी पाठवायचे, याविषयी कळवले जाईल. त्यानुसार आश्रमात येणारे वाहन किंवा साधक यांच्यासह ते पाठवून द्यावे.
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
सनातनच्या आश्रमांत पावसाळ्याच्या पूर्वसिद्धतेसाठी खालील साहित्याची आवश्यकता !
अधिक मासात सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ इतरांना देऊन सर्वश्रेष्ठ अशा ज्ञानदानाचे फळ मिळवा !
अधिक मास निमित्त धर्मप्रसाराचे कार्य अव्याहतपणे करणार्या सनातनच्या आश्रमांना अन्नदान करून पुण्यसंचयासह आध्यात्मिक लाभही मिळवा...
हिंदूंनो, काळानुसार साधना म्हणून श्रीरामरक्षा आणि मारुतिस्तोत्र यांचे प्रतिदिन पठण करा !