१४.१.२०२५ या दिवशी मकरसंक्रांत, तर ४.२.२०२५ या दिवशी रथसप्तमी आहे. या कालावधीत सुवासिनी स्त्रिया अन्य स्त्रियांना भांडी, प्लास्टिकच्या वस्तू किंवा नित्योपयोगी साहित्य वाण म्हणून देतात. वाण द्यावयाची वस्तू अधिक संख्येत विकत घ्यायची असल्यास त्याची मागणी आतापासूनच करावी लागते.
सनातनचे ग्रंथ, तसेच सात्त्विक उत्पादने वाण म्हणून देण्यास सर्वाेत्तम आहेत. त्यामुळे साधकांनी वाचक, जिज्ञासू, महिला मंडळे, तसेच बचत गट आदींना लवकरात लवकर संपर्क करून सात्त्विक वाण देण्याचे महत्त्व सांगावे आणि सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ अन् उत्पादने वाण म्हणून देण्यास प्रवृत्त करावे.
वाण देण्यासाठी समाजातून ग्रंथ वा उत्पादने यांची मागणी आल्यास साधकांनी ती स्थानिक वितरकांकडे द्यावी.

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
एखाद्याला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार उपाय शोधून देतांना त्याला होणार्या त्रासाचे कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...