ग्रंथप्रदर्शनावर येणार्‍या जिज्ञासूंना हवा असलेला ग्रंथ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करा !

‘सनातन शॉप’, या संकेतस्थळावर सनातनचे मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती या भाषांतील ग्रंथ उपलब्ध आहेत. या संकेतस्थळावरून जिज्ञासूंना ग्रंथ घरपोच मिळण्यासाठी मागणी करता येईल…

गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावी जातांना, तसेच इतर वेळीही प्रवास करतांना शक्य असल्यास सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, लघुग्रंथ आदी समवेत ठेवून त्यांचा प्रसार करा !

प्रवासात स्वतःजवळ ग्रंथ, लघुग्रंथ, तसेच ‘सनातन प्रभात’ची नियतकालिके ठेवा !

पैशांची देवाण-घेवाण, आर्थिक किंवा भूमीचे व्यवहार करणे, तसेच विवाह जुळवणे आदी वैयक्तिक गोष्टी आपल्या जबाबदारीवर कराव्यात !

सनातन संस्था गेली २५ वर्षे अध्यात्मप्रसाराचे कार्य करत आहे. या कालावधीत साधक, वाचक, हितचिंतक यांचा परस्पर परिचय होऊन ते अध्यात्म अन् साधना यांसह वैयक्तिक स्तरावर काही व्यवहार करत असल्यासे निदर्शनास आले आहे…

श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !

‘२५.७.२०२५ या दिवसापासून श्रावण मासाला आरंभ होत आहे. या काळात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, राखीपौर्णिमा, श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाला आणि पोळा हे सण येतात. या वेळी अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करता येतील…

साधकांनो, सध्या वाईट शक्तींचे त्रास दूर करण्यासाठी ‘ॐ’ हा नामजप मिळत आहे, म्हणजे वाईट शक्तींचे सर्वाेच्च स्तराचे आक्रमण होत आहे आणि ही अंतिम लढाई असल्याने साधना वाढवली, तर धर्माचा विजय होणार आहे !

सध्या (जून २०२५ मध्ये) आध्यात्मिक उपाय करतांना असे लक्षात आले, ‘अधिकतर वेळा ‘ॐ’ हा नामजप मिळत आहे.’ यापूर्वी ‘महाशून्य’ किंवा फार तर ‘निर्गुण’ हा नामजप मिळायचा. यावरून लक्षात येते, ‘वाईट शक्ती आता आक्रमण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.’

भावी पिढीवर सुसंस्कार करणार्‍या सनातनच्या ‘संस्कार वह्या’ लवकरात लवकर घरोघरी पोचवा !

१. सनातन वह्यांची वैशिष्ट्ये १ अ. विद्यार्थ्यांच्या मनावर भारताचा उज्ज्वल इतिहास बिंबवणारे लिखाण वह्यांवर प्रसिद्ध केले जाते ! : ‘सनातनने प्रसिद्ध केलेल्या ‘संस्कार वही’वर विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करणारे, त्यांना हिंदु संस्कृतीचे पालन करण्यास शिकवणारे, धर्मशिक्षण देणारे आणि राष्ट्रप्रेम वाढवणारे लिखाण अन् चित्रे असतात. त्यामुळे केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर पालक आणि शिक्षक या सर्वांनाच आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा … Read more

भारतियांत सत्त्वगुणी पिढी निर्माण होण्यासाठी प्रत्येक शाळेत सत्संगाच्या माध्यमातून मुलांना आध्यात्मिक शिक्षण देणे आवश्यक !

हल्लीच्या शिक्षण पद्धतीनुसार शाळेमध्ये विद्यार्थ्यांना केवळ लौकिक उत्कर्षासाठीचे शिक्षण दिले जाते; पण त्यामध्ये त्यांच्या पारमार्थिक उत्कर्षासाठी काहीच शिकवले जात नाही.

साधकांनो, आध्यात्मिक त्रासांची तीव्रता वाढल्यामुळे आध्यात्मिक उपाय नियमित करण्यासह व्यष्टी साधनाही वाढवा !

आताचा आपत्काळ आपल्याला अतिशय कठीण वाटतो; पण हा काळ संधीकाळही आहे. ‘या काळात साधनेचे थोडे जरी प्रयत्न केले, तरी त्याचे फळ अधिक प्रमाणात मिळते’, हे या संधीकाळाचे महत्त्व आहे.

अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने ग्राहकांना भेट म्हणून सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ देण्यासाठी सराफी दुकानदारांना उद्युक्त करा !

सनातनची अनमोल ग्रंथसंपदा अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्याच्या दृष्टीने साधकांनी सर्वत्रच्या सराफी दुकानदारांना संपर्क करावा.

सनातनच्‍या सात्त्विक मूर्ती सिद्ध करण्‍याच्‍या सेवेत योगदान द्या !

जे साधक, हितचिंतक, वाचक आदींना मूर्तीकलेविषयी ज्ञान आहे किंवा ज्‍यांची हे सर्व साधना म्‍हणून शिकण्‍याची अन् सेवा करण्‍याची इच्‍छा आहे, अशांनी त्‍यांची नावे जिल्‍हासेवकांच्‍या माध्‍यमातून कळवावी.