साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

‘१५.१२.२०२४ ते ५.३.२०२५’ या काळात प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे कुंभपर्वामध्ये धर्मप्रसाराची सेवा करण्यासाठी भारतभरातील अनेक धर्मप्रेमी आणि साधक कुंभक्षेत्री वास्तव्याला असणार आहेत. त्यांच्या निवासाच्या दृष्टीने, तसेच विविध सेवांसाठी प्रयागमध्ये वास्तूची (घर, सदनिका (फ्लॅट), सभागृह (हॉल) यांची) आवश्यकता आहे.
जे साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी धर्मप्रसाराच्या सेवांकरता प्रयागमधील स्वतःची वास्तू विनामूल्य वापरण्यासाठी अथवा अल्प भाडे तत्त्वावर देऊ शकतात, त्यांनी कृपया कळवावे. प्रयागमधील झूंसी, अलोपीबाग, अल्लापूर, सोहबतिया बाग, दारागंज, टागोर टाऊन, जॉर्ज टाऊन या भागांत ही वास्तू असल्यास सुलभ होईल; परंतु या व्यतिरिक्त अन्य भागांमधील वास्तूही चालू शकेल.
नाव आणि संपर्क क्रमांक
सौ. भाग्यश्री सावंत : ७०५८८८५६१०
संगणकीय पत्ता : [email protected]
टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन : ४०३४०१
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
एखाद्याला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार उपाय शोधून देतांना त्याला होणार्या त्रासाचे कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
सनातनच्या आश्रमांत पावसाळ्याच्या पूर्वसिद्धतेसाठी खालील साहित्याची आवश्यकता !