इंडोनेशियामध्ये पूर आणि भूस्खलन यांमुळे आतापर्यंत १४० हून अधिक जणांचा मृत्यू

 इंडोनेशियातील पूर्व भागात पूर आणि भूस्खलन यांमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १४० हून अधिक झाली, तर मोठ्या संख्येने लोक बेपत्ता आहेत. अदोनारा बेटावरील पूर्व फ्लोरेस जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मनुष्यहानी झाली आहे. येथे झालेल्या भूस्खलनात अनेक लोकांचा मृत्यू झाला.

देशात आणीबाणी आणि युद्ध यांसारखी स्थिती निर्माण होऊ शकते !

येत्या १३ एप्रिल या दिवशी हिंदु नववर्ष म्हणजे गुढी पाडवा आहे. या नववर्षाचा राजा मंगळ ग्रह असणार आहे. जेव्हा वर्षाचा राजा आणि मंत्री मंगळ सारखा ग्रह असतो त्या वेळी हिंदु ज्योतिषशास्त्रानुसार युद्ध आणि आणीबाणी यांची स्थिती निर्माण होते.

येत्या ४ आठवड्यांत जागतिक महायुद्धाला प्रारंभ होईल ! – रशियातील संरक्षणतज्ञाचा दावा

येत्या ४ आठवड्यांत म्हणजे मासाभरात जागतिक युद्धाला प्रारंभ होऊ शकतो, असा दावा रशियाचे संरक्षणतज्ञ पावेल फेलगेनहॉर यांनी केला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचे महायुद्धात रूपांतर होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

आसाममध्ये भूकंपाचे तीव्र धक्के

आसाममध्ये २८ एप्रिलला सकाळी भूकंपाचे एका मागोमाग एकूण ५ तीव्र धक्के बसले. ६.४ रिक्टर स्केल एवढे तीव्रतेचे हे धक्के होते. जवळपास अर्धा मिनिट हे धक्के जाणवत होते. यात जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

अमेरिकेच्या दक्षिण भागात आलेल्या हिमवादळामुळे वीज, पाणी आणि अन्न यांविना लाखो लोकांचे प्रचंड हाल !

महासत्ता असलेल्या अमेरिकेला निसर्गाच्या तडाख्यासमोर हतबल व्हावे लागते, तेथे भारताची काय स्थिती होईल, याची कल्पना येते ! अशा आपत्काळात सुरक्षित आणि जिवंत रहाण्यासाठी साधना करून ईश्वरी कृपा संपादन करणेच आवश्यक !

देशात गेल्या वर्षी बसले भूकंपाचे ९५६ धक्के !

वर्ष २०२० मध्ये भारतात ९६५ वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. याचा अर्थ दिवसाला तीनवेळा असे धक्के बसले. यात १३ हून अधिक धक्के देहलीमध्ये जाणवले. यातील ३ धक्के तीव्रतेपेक्षा अधिक होते. नॅशनल सेंटर ऑफ सीस्मोलॉजीकडून (एन्.सी.एस्.कडून) ही आकडेवारी देण्यात आली आहे

भारतासह जगात १२ घंट्यांत ३ ठिकाणी भूकंपाचे धक्के

जगभरात गेल्या १२ घंट्यांमध्ये ३ ठिकाणी भूकंपाचे धक्के बसले आहेत. समुद्राखाली झालेला हा भूकंप ७.७ रिक्टर स्केल इतका तीव्र होता.

कोरोनापेक्षाही अधिक धोकायदायक ‘कॅण्डीडा ऑरिस’ बुरशीची साथ येऊ शकते ! – वैज्ञानिकांची चेतावणी

जगात कोरोनाचा प्रभाव न्यून झाला नसतांना आता कोरोना विषाणूप्रमाणेच एका बुरशीची जागतिक स्तरावर मोठी साथ येऊ शकते, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. ‘कॅण्डीडा ऑरिस’ असे या बुरशीचे नाव असून ही मानवासाठी अत्यंत घातक आहे.

हिंगोली जिल्ह्यातील ३ तालुक्यांतील ४० गावांमध्ये भूकंपाचे धक्के !

जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी आणि औंढा नागनाथ या तालुक्यांमध्ये ३० जानेवारीच्या मध्यरात्री १२ वाजून ४० मिनिटांनी ४० गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.

वाढत्या तापमानामुळे समुद्राच्या पातळीमध्ये वाढ होण्याच्या शक्यतेने जगातील २६० पेक्षा अधिक विमानतळ बुडण्याचा धोका !

समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे जगभरातील शेकडो विमानतळांवरील उड्डाणे विस्कळीत होण्याचा धोका आहे, असे एका नव्या अभ्यासानुसार सांगण्यात आले आहे.