रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धाचे महायुद्धात रूपांतर होण्याची शक्यता !
मॉस्को (रशिया) – येत्या ४ आठवड्यांत म्हणजे मासाभरात जागतिक युद्धाला प्रारंभ होऊ शकतो, असा दावा रशियाचे संरक्षणतज्ञ पावेल फेलगेनहॉर यांनी केला आहे. रशियाच्या सैनिकांनी मोठ्या प्रमाणात दारुगोळ्यासह युक्रेनच्या पूर्व भागातील सीमेकडे कूच केल्याच्या घटनेचा अभ्यास केल्यानंतर पावेल फेलगेनहॉर यांनी हा दावा केला आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचे महायुद्धात रूपांतर होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. (जागतिक महायुद्धाची शक्यता लक्षात घेता भारतानेही आतापासूनच संरक्षणासाठी योग्य ती पावले उचलायला हवीत ! – संपादक)
#WorldWar will begin in a month, warns military analyst, cites THIS reason#Russia #Ukraine https://t.co/tPFDD3jJIn
— DNA (@dna) April 6, 2021
पावेल फेलगेनहॉर यांनी म्हटले की, सध्या चालू असलेल्या रशिया आणि युक्रेन या दोन देशांमधील तणावामुळे युरोपमध्ये युद्ध होण्याची शक्यता बळावते आहे. पश्चिमेकडील देशांना याविषयी काय करायचे, हेच ठाऊक नाही. या परिस्थितीमध्ये अमेरिकेने युक्रेनला साहाय्य करण्याचे अश्वासन दिले आहे.

उडुपी (कर्नाटक) येथील ज्योतिषी श्री. जयतीर्थ आचार्या यांनी आगामी भीषण काळासंबंधी वर्तवलेली भविष्यवाणी !
रायगड जिल्ह्यातील महाड येथील साधकाने आपत्काळाची अनुभवलेली भयावह स्थिती अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांची...
‘सितरंग’ चक्रीवादळामुळे बांगलादेशात २४ ठार, २ लाखांहून अधिक लोकांना फटका
युरोपात युद्धाचे ढग गडद !
२४० कि.मी. वेगात अमेरिकी किनारपट्टीला धडकले ‘इयान’ चक्रीवादळ !
अमेरिकेतील दुष्काळाचा कृषी उत्पन्नावर परिणाम, तर युरोपातही अन्नधान्य टंचाई होण्याची चिन्हे !