कुंकू किंवा गंध लावण्याच्या काही पद्धती अन् त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

‘बहुतांश हिंदु स्त्रिया आणि काही पुरुष कपाळाला कुंकू किंवा गंध लावतात. त्यांची पद्धती प्रांताप्रमाणे किंवा संप्रदायाप्रमाणे निरनिराळी आहे. स्त्रियांनी आणि काही पुरुषांनी कपाळाला कुंकू किंवा गंध लावण्याचे आध्यात्मिक महत्त्व पुढीलप्रमाणे आहे.

कुंकू कसे लावावे ?

प्रस्तुत लेखात आपण कुंकू लावण्याचे महत्त्व आणि लाभ, कुंकू कधी अन् कसे लावावे, एका स्त्रीने दुसर्‍या स्त्रीला कपाळावर कुंकू कसे लावावे, सिंदुरापेक्षा कुंकवाचा वापर करणे अधिक योग्य का, यांविषयीच्या कृती त्यांमागील अध्यात्मशास्त्रीय कारणांसहित जाणून घेऊया.