वनौषधी आणि ऐतिहासिक स्थाने असलेले लातूर येथील ‘संजीवनी बेट’ !

भारतामध्ये असणार्‍या ऐतिहासिक आणि जीवनोपयोगी अमूल्य ठेव्याकडे दुर्लक्ष करणारा पुरातत्व विभाग काय कामाचा ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? ‘सरकारने पुरातत्व विभागाला याकडे लक्ष देऊन त्याचे संवर्धन करण्यास भाग पाडावे’, असेच जनतेला वाटते !

कर्नाटक राज्यातील मंदिरांचा इतिहास

सप्तर्षींच्या आज्ञेने श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी कर्नाटक राज्यातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात असलेले कटीलू येथील श्री दुर्गापरमेश्वरी मंदिर, धर्मस्थळ येथील श्री मंजुनाथेश्वर मंदिर आणि उडुपी येथील श्रीकृष्ण मंदिरात जाऊन साधकांसाठी प्रार्थना केली.

श्रीरामावतार होण्यासाठी ‘पुत्रकामेष्टी’ याग करणारे शृंगीऋषि यांच्या बागी (हिमाचल प्रदेश) येथील तपोभूमी

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिमाचल प्रदेश राज्यातील कुलु जिल्ह्यातील विविध दैवी स्थानांना भेट देऊन ‘आपत्काळात साधकांचे रक्षण व्हावे आणि ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना व्हावी’, यासाठी प्रार्थना केली. अशा या दैवी क्षेत्रांतील कुलु प्रदेशात अनेक ऋषींची तपस्थाने आहेत. तेथे असलेल्या ‘शृंगीऋषि’ यांच्या तपस्थानाविषयी जाणून घेऊया.

कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील देवदर्शनाचा वृत्तांत !

आपल्या धर्मग्रंथांमध्ये ‘काशी’ आणि ‘कांची’, हे शिवाचे दोन नेत्र आहेत’, असे म्हटले जाते. पृथ्वीवरील मोक्ष प्रदान करणार्‍या सप्तपुरी, म्हणजे काशी, गया, अयोध्या, मथुरा, द्वारका, कांची, उज्जैन आणि हरिद्वार. यांमध्ये ‘कांचीपूरम्’ एक आहे.

कुलु खोर्‍यामध्ये अधिष्ठात्री देवता ‘बिजली महादेव’ आणि ‘बेखलीमाता’ (भुवनेश्वरीदेवी) यांचे आहे चैतन्यमय स्थान !

सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे या प्रवासात श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी हिमाचल प्रदेश राज्यातील कुलु जिल्ह्यातील विविध दैवी स्थानांचे दर्शन घेतले आणि ‘हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी अन् आपत्काळात साधकांचे रक्षण व्हावे’, यासाठी प्रार्थना केली.

अरेयूरु (कर्नाटक) येथील श्री वैद्यनाथेश्वर शिवाचे दर्शन घेतल्यानंतर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना आलेल्या अनुभूती !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी कर्नाटक राज्यातील तुमकुरू जिल्ह्यातील अरेयूरु गावात असलेल्या श्री वैद्यनाथेश्वर शिवाचे दर्शन घ्यावे. त्या वेळी त्यांनी शिवलिंगावर अभिषेक करावा आणि त्याची पूजा करावी अन् वेदांतील ‘चमकम्’ हे मंत्र ऐकावेत, तसेच सर्वत्रच्या सनातनच्या साधकांच्या आरोग्यासाठी शिवाला प्रार्थना करावी.’

चोटीला (गुजरात) येथील आदिशक्तीचे रूप असलेल्या श्री चंडी-चामुंडा देवीचे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतलेल्या दर्शनाचा वृत्तांत !

सप्तर्षींनी पुढे सांगितले, ‘‘चोटीला गावात डोंगरावर ‘चंडी-चामुंडा’ नावाच्या देवींच्या मूर्ती आहेत. या देवी दोन दिसत असल्या, तरी त्या एकच (एकरूप) आहेत. चंडी आणि चामुंडा ही आदिशक्तीची रूपे आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोघी चंडी अन् चामुंडा यांची रूपे आहेत.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी शेषनागाच्या फुंकरीतून निर्माण झालेल्या ‘मणिकर्ण तप्तकुंड’ (जिल्हा कुलु) या स्थानाला दिलेली भेट !

देवभूमी हिमाचल प्रदेश येथे कुल्लु नावाचे नगर आहे. या नगराच्या चारही दिशांना अनेक दैवी स्थाने आहेत. ‘कुल्लु’ म्हणजे पूर्वीच्या काळातील ‘कुलांतपीठ !’ जेथे मनुष्यकुळ संपते आणि देवकुळ चालू होते, म्हणजेच जे देवतांचे निवासस्थान आहे, ते म्हणजे ‘कुलांतपीठ !’ अशा कुलु प्रदेशात ‘मणिकर्ण’ नावाचे स्थान आहे.

स्मृतिकार आणि गोत्रप्रवर्तक पराशर ॠषि यांचे तपोस्थळ अन् ‘पराशर ताल’

महर्षि व्यास यांचे पिता पराशर ऋषि यांचे कुल्लु (हिमाचल प्रदेश) येथील तपोस्थळ आणि पराशर ताल यांचे छायाचित्रात्मक दर्शन !