प्रभु श्रीरामचंद्रांच्या अस्तित्वाने पावन झालेल्या रामटेक (जिल्हा नागपूर) येथील प्राचीन अष्टदशभुज श्री गणेशमूर्ती !

श्री गणेशोत्सव : दर्शन, शास्त्र अन् इतिहास

केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर अखिल भारतवर्षाचे आराध्यदैवत श्री गणेश ! गणेशोत्सवाच्या कालावधीत ब्रह्मांडातील श्री गणेशाचे तत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटींनी अधिक प्रमाणात पृथ्वीतलावर येत असते. गणेशोत्सवासंदर्भात एक विशेष सूत्र असेही आहे की, हा उत्सव जागतिक स्तरावर सर्वांत मोठा उत्सव म्हणून सुविख्यात आहे. 

गणेशभक्तांची श्री गणेशाप्रती
भाव-भक्ती वृद्धिंगत व्हावी, या हेतुने आणि श्री गणेशाच्या कृपेने श्री गणेशोत्सव

दर्शन, शास्त्र अन् इतिहास या विशेष सदरात आपण श्री गणेशाशी संबंधित विशेष माहिती, उपासनाशास्त्र, विविध प्रसिद्ध गणपती मंदिरांतील गणरायाच्या मूर्तींची छायाचित्रे, ऐतिहासिक माहिती, तसेच ऋषिपंचमी इत्यादींविषयी वैशिष्ट्यपूर्ण माहिती जाणून घेत आहोत.

विदर्भाचे भूषण । रामटेक हे श्रद्धास्थान ।

त्या रामक्षेत्री सुंदर । अठराभुजा गजानन ।

पंचफण्यांचा शिरावर । नाग सावली करीत असे ।

कंठ भूषण नागाचे । नागपट्टी ही कटीचे ।

प्रभु श्रीरामचंद्रांच्या चरणांनी पावन झालेले नागपूर जिल्ह्यातील रामटेक हे पवित्र तीर्थक्षेत्र ! येथील गडाच्या पायथ्याशी असलेल्या शैवल्य पर्वतावर अठराभूजा गणेशाचे स्थान आहे. शैवल्य पर्वत म्हणजेच शम्बूक ऋषींचे आश्रयस्थान ! या पर्वतावर विद्याधराची संस्कृती होती. अठरा विषयांचे ज्ञान असलेल्या या विद्याधराची दृष्टीच अठरा भुजा गणपतीत आढळते.

रामटेक गडाच्या पायथ्याशी स्थित या मंदिरात अठराभुजा असलेली साडेचार ते पाच फूट उंच, संगमरवरी दगडाची वैशिष्ट्यपूर्ण अतीप्राचीन अशी ही श्री गणेशमूर्ती आहे. तिला अष्टदशभुज असे संबोधतात. ही मूर्ती विदर्भातील अष्टगणेशांपैकी एक आहे. मूर्तीच्या सोळा हातात अंकूश, पाश, खटवांग, त्रिशूळ, परशू आदी विविध शस्त्रे असून एका हातात मोदक अन् दुसर्‍या हातात मोरपंखाची लेखणी आहे. अष्टदश भुजेची सोंड वेटोळी, अर्ध्वअधर आहे. अठराभुजा गणेशाच्या डोक्यावर पाच फण्यांचा नाग असून गळ्यातही नाग आहे, तसेच कमरेला नागपट्टा आहे.

५०० वर्षांहून अधिक प्राचीन इतिहास असलेली ही मूर्ती केवळ विदर्भाचेच नव्हे, तर महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे. अठरा सिद्धींमुळे अठराभुजा गणपतीचे शास्त्रपुराणात विघ्नेश्‍वर म्हणून पूजन होते.

या मंदिरात मध्यभागी महागणपती विराजमान असून डाव्या बाजूला रिद्धी-सिद्धी आहेत.

रामटेक (जिल्हा नागपूर) येथील अष्टदशभुज श्री गणेशमूर्ती ! हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी तिला मनोमन भावपूर्ण प्रार्थना करूया !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment