थेऊर (जिल्हा पुणे) येथील गणेशभक्त मोरया गोसावी यांच्या उपासनेचे स्थान !

श्री गणेशोत्सव : दर्शन, शास्त्र अन् इतिहास

केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर अखिल भारतवर्षाचे आराध्यदैवत श्री गणेश ! गणेशोत्सवाच्या कालावधीत ब्रह्मांडातील श्री गणेशाचे तत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटींनी अधिक प्रमाणात पृथ्वीतलावर येत असते. गणेशोत्सवासंदर्भात एक विशेष सूत्र असेही आहे की, हा उत्सव जागतिक स्तरावर सर्वांत मोठा उत्सव म्हणून सुविख्यात आहे. गणेशभक्तांची श्री गणेशाप्रती भाव-भक्ती वृद्धींगत व्हावी, या हेतूने आणि श्री गणेशाच्या कृपेने ‘श्री गणेशोत्सव : दर्शन, शास्त्र अन् इतिहास’ या विशेष सदरात आपण श्री गणेशाशी संबंधित विशेष माहिती, उपासनाशास्त्र, विविध प्रसिद्ध गणपती मंदिरांतील गणरायाच्या मूर्तींची छायाचित्रे, ऐतिहासिक माहिती इत्यादींविषयी वैशिष्ट्यपूर्ण माहिती जाणून घेत आहोत.

१४ व्या शतकातील महान गणेशभक्त मोरया गोसावी हे त्यांच्या उत्कट गणेशभक्तीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी पुणे जिल्ह्यातील मोरगांव येथे गणेशाची भक्ती केली. तसेच थेऊर येथेही एका खडकावर बसून गणेशोपासना केली. थेऊर हे गाव मुळा-मुठा नदीच्या काठावर वसलेले आहे.

गणपतीने मोरया गोसावी यांना असा साक्षात्कार दिला की ‘‘मी (गणपति) तुझ्या पूजेकरिता चिंचवड येथे प्रकट होणार आहे.’’ त्यानंतर त्यांना कर्‍हा नदीच्या पात्रात श्री गणेशमूर्ती प्राप्त झाली. पुढे ते मोरगावहून चिंचवड येथे स्थायिक झाले. त्यांनी तेथे गणपति मंदिर उभारले. त्यात कर्‍हेत प्राप्त झालेल्या श्री गणेशमूर्तीची स्थापना केली. काही कळाने मोरया गोसावी यांनी तेथेच संजीवन समाधी घेतली.

गणेशभक्त मोरया गोसावी यांनी थेऊरजवळ ज्या स्थानी बसून साधना केली, तो पवित्र खडक आणि स्थान ! मोरया गोसावी यांच्या उत्कट गणेशभक्तीची ग्वाही देणार्‍या या स्थानाला भावपूर्ण नमस्कार करूया !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात