श्रीमद्भगवद्गीतेचे महत्त्व आणि त्यातील श्लोकाचा सुंदर भावार्थ
श्रीमद्भगवद्गीतेचा महिमा गंगा नदीपेक्षाही अधिक आहे. श्रीमद्भगवद्गीता ही गायीसमान आहे आणि तिचे दूध काढणारा गोपाळ हा भगवान श्रीकृष्ण आहे. गीतारूपी दुग्ध हे वेदांचे सार आणि अर्जुन हा गोवत्सासारखा (वासरासारखा) आहे. विवेकी महात्मे आणि शुद्ध भक्त या गीतारूपी दुग्धामृताचे पान करतात.
