भगवान शिवाला काशीक्षेत्री वास्तव्य करता यावे, यासाठी कार्य करून काशीक्षेत्रीच विराजमान झालेला श्री धुंडीराज विनायक !
‘काशी (उत्तरप्रदेश) येथे सहस्रो मंदिरे आहेत. त्यात गणेशाची ५६ मंदिरे आहेत. या ५६ गणेशांमध्ये श्री धुंडीराज विनायक विशेष आहे. असे म्हटले जाते की, काशीची परिक्रमा केल्यावर श्री धुंडीराज विनायकाचे दर्शन घ्यावे.
