अयोध्येमध्ये श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतले प्रभु श्रीरामाची कुलदेवी श्री देवकालीमातेचे आशीर्वाद !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी २ ऑगस्ट या दिवशी श्रीरामाची कुलदेवी श्री देवकालीदेवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले, तसेच ३ ऑगस्टला बालकरूपातील श्रीरामाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

श्रीचित्‌शक्ति् (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या अयोध्या दौर्‍याच्या संदर्भाने घडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी आणि मिळालेले ईश्‍वरी संकेत !

‘श्रीचित्‌शक्ति् (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ३१.७.२०२० या दिवशी अयोध्येला जावे. या वेळी त्यांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या वतीने श्रीराममंदिराच्या भूमीपूजनासाठी दान द्यावे’, अशी आज्ञा सप्तर्षींनी सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून केली होती.

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना पंढरपूर येथील मंदिरात दर्शनाला गेल्यावर आशीर्वादरूपात मिळालेला विठ्ठलाच्या डोक्यावरील मोरपिसांचा अलंकार !

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मंदिरात आल्या. जेव्हा त्यांना लांबूनच विठ्ठलाचे दर्शन झाले, तेव्हा त्यांना विठ्ठलाच्या डोक्यावर मोरपिसांचा अलंकार घातलेला दिसला.

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याशी बोलतांना साधनेविषयीची सूत्रे ऐकून सिंगापूरसारख्या महागड्या देशातील टॅक्सीचालकाने निवासाच्या ठिकाणी पोहोचवण्याचे पैसे न घेणे

एका ठिकाणची सेवा संपवून आम्ही ज्या ठिकाणी रहाणार होतो, त्या हॉटेलवर जाण्यासाठी टॅक्सी बोलावली. त्या टॅक्सीचा चालक बौद्ध होता. त्याच्या बोलण्यातून कळले की, तो शुद्ध शाकाहारी आहे.

कुठे मानसिक स्तरावर देवतांना टोपण नावे देऊन त्यांची विटंबना करणारे सध्याचे जन्महिंदू, तर कुठे देवालयांसह माणसांनाही देवतांची नावे देऊन सतत ईश्‍वरी अनुसंधान साधणारे हिंदूंचे पूर्वज !

देवतेच्या अनेक नामांपैकी केवळ एकाच नामावर आपले मन, बुद्धी आणि चित्त एकाग्र करून त्याचे स्मरण केल्याने अनुसंधान साधता येते. हे साध्य करण्यासाठी पूर्वीच्या काळी मुलांना ‘केशव, माधव, पांडुरंग, राधा, सीता, गौरी’, अशी देवतांची नावे ठेवली जात आणि त्याच नावाने त्यांना हाक मारली जात असे.