वढू (जिल्हा पुणे) येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीची छायाचित्रे !

sambhaji_maharaj_samadhi
वढू, तुळापूर येथील संभाजी महाराज यांचे स्मारक
IMG_9373_c
वढू बुद्रुक, पुणे येथील छत्रपती संभाजी महाराजांची समाधी.
IMG_9376
वढू बुद्रुक, पुणे येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीची इमारत

छत्रपती संभाजी महाराजांनी इस्लाम स्वीकारावा यासाठी औरंगजेबाने त्यांना हालहाल करून मारले, त्यांच्या पार्थिवाचे तुकडे करून वढू, तुळापूर (जि. पुणे) येथे टाकले. आज त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात आले आहे.

वढू बुद्रुक येथे महाराजांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तेथेही समाधी उभारण्यात आली आहे. त्या ठिकाणची छायाचित्रे पाहून छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखे प्रखर धर्मप्रेम स्वत:त निर्माण करण्यासाठी प्रयत्न करूया !

 

छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन
आणि गुढीपाडवा यांचा काहीही संबंध नाही, हे जाणा !

छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन आणि गुढीपाडवा हा नववर्षारंभदिन लागोपाठ येतात. वर्ष २०१३ मध्ये खानदेश आणि मराठवाडा येथे काही जात्यंधांनी गुढ्या उभारणे, हा छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान आहे, असे सांगत हिंदूंना गुढ्या उभारू दिल्या नाहीत आणि उभारलेल्या गुढ्या खेचून काढल्या. गतवर्षीही जळगावमध्ये या जात्यंधांकडून असे प्रयत्न केले जाणार असल्याचे समजते. फेसबूक, व्हॉट्स अ‍ॅप यांसारख्या सामाजिक संकेतस्थळांवरून गुढीपाडव्याविषयी जात्यंधांकडून अपप्रचार केला जात आहे. जात्यंधांकडून गुढीपाडव्याविषयी केली जाणारी टीका आणि त्याचे खंडण आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.

टीका : (म्हणे) शुभ समजला जाणारा कलश गुढीपाडव्याच्या दिवशी उलट का लावतात ?

खंडण : गुढीवर उलट घालण्यात आलेल्या कलशाच्या काही प्रमाणात निमुळत्या झालेल्या भागातून तो ब्रह्मांडमंडलातून प्रजापति-लहरी आकृष्ट करून घेतो. या लहरी कलशात सामावून रहातात. कलश उलट घातल्यामुळे ती स्पंदने भूमंडलाकडे आणि पूजकाकडे प्रक्षेपित होतात. देवळातील कळस हासुद्धा याचप्रमाणे वरच्या दिशेने पूर्णपणे निमुळता असतो आणि तो लहरी आकृष्ट करतो.

टीका : (म्हणे) ब्राह्मणांनीच शंभूराजांची हत्या करून गुढी उभारायला प्रारंभ केला !

खंडण
१. अ. वर्ष १६८९ मध्ये औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना फाल्गुन अमावास्येच्या दिवशी हालहाल करून मारले. दुसर्‍या दिवशी चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा, म्हणजेच गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्षदिन होता. हिंदूंनी तो साजरा करू नये, असा औरंगजेबाचा त्यामागे हेतू होता. वस्तूतः हत्येचा गुढीपाडव्याच्या दिवशी उभारल्या जाणार्‍या गुढीशी काहीच संबंध नाही. प्रभु श्रीराम वनवास संपवून अयोध्येत परतले, तेव्हापासून गुढ्या उभारणे, तोरणे लावणे, ही आपली परंपरा आहे. सृष्टीच्या निर्मितीचा दिवस म्हणूनही गुढीपाडव्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टी निर्माण केल्याचे मानले जाते. म्हणजेच खरे तर हा दिवस केवळ हिंदूंचाच नसून अखिल विश्‍वातील मानवजातीचा आहे.

२. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून मारले, हा सूर्यप्रकाशाइतका स्वच्छ इतिहास आहे. अनेक ठिकाणी तो संदर्भांसह उपलब्धही आहे. आजपर्यंत एकाही इतिहासकाराने छत्रपती संभाजी महाराजांना ब्राह्मणांनी मारले, असे म्हटलेले नाही. असे असतांना क्रूरकर्मा औरंगजेबाचे पाप झाकण्याचा प्रयत्न काही जात्यंध का करत आहेत ? असा प्रश्‍न हिंदूंनी त्यांना खडसवून विचारला पाहिजे.

यापूर्वीही काही जात्यंधांनी ब्राह्मणांनी संत तुकाराम महाराजांचा खून केला, असा आरोप केला होता. त्याला हिंदूंनी दाद लागू दिली नाही. हिंदूंनो, गुढीपाडव्याविषयी या जातीद्वेषमूलक प्रसारालाही दाद लागू न देता हिंदु संस्कृतीनुसार गुढीपाडवा साजरा करून धर्माचरण करा ! तो अधिकाधिक हिंदूंनी शास्त्रशुद्धपणे साजरा करणे, हीच जात्यंधांना चपराक असेल !

 

छत्रपती संभाजी महाराजांचे धर्मांतरितांच्या पुनर्प्रवेशाचे कार्य

Sambhaji_Maharaj
छत्रपती संभाजी महाराज

हरसुलच्या गंगाधर कुलकर्णी या बळजबरीने बाटून मुसलमान झालेल्या ब्राह्मणास शुद्ध करून पुन्हा हिंदु धर्मात घेण्याचे धाडस छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांनी दाखवले. (हे धाडसच होते; कारण तेव्हा अशा हिंदूंना परत घेण्यासाठी हिंदूंमधूनच मोठा विरोध होत असे. त्यामुळे गंगाधरास त्र्यंबकेश्‍वर येथे पाठवून तेथील प्रायश्‍चित्त विधी पूर्ण करून घेतले. त्यास शुद्धीपत्र देऊन स्वतःच्या पंगतीस भोजनास बसवून तो पुनर्प्रवेश करवून घेण्यात आला.)
(संदर्भ : शिवपुत्र संभाजी, लेखिका – डॉ. (सौ.) कमल गोखले)

 

छत्रपती संभाजी महाराजांचे धर्मांतराच्या विरोधातील कठोर धोरण !

मराठे आणि इंग्रज यांच्यात १६८४ मध्ये जो तह झाला, त्यात छत्रपती संभाजी महाराजांंनी एक अट घातली होती, ती अशी, इंग्रजांना माझ्या राज्यातून गुलाम करण्यासाठी किंवा ख्रिस्ती धर्मात बाटवण्यासाठी माणसांना विकत घेण्यास अनुमती नाही. (संदर्भ : शिवपुत्र संभाजी, लेखिका – डॉ. (सौ.) कमल गोखले)

औरंगजेबाने अनन्वित अत्याचार करूनही छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मांतर केले नाही. सध्या मुसलमान आणि ख्रिस्ती हिंदूंना वेगवेगळी आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर करतात. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी केलेला त्याग आठवून स्वतःमध्ये धर्मतेज जागवण्याची बुद्धी अशा हिंदूंना व्हावी, हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात