साक्षात ईश्वराने सनातनला दिलेले अनमोल आणि दिव्य कृपाछत्र : योगतज्ञ दादाजी वैशंपायन !
योगतज्ञ दादाजींची सनातनशी भेट होणे, हे ईश्वराचे सुंदर नियोजन असून दिव्य सिद्ध मंत्र आणि योगसामर्थ्य यांमुळे त्यांनी अनेक साधकांच्या प्राणांचे रक्षण केले आहे. त्यांनी सिद्ध केलेले मंत्र, ते स्वतः करत असलेली अनुष्ठाने आणि इतर अनेक दिव्य उपचार यांमुळे साधकांभोवती दिव्य संरक्षक-कवच निर्माण होऊन त्यांच्या आध्यात्मिक त्रासाचे प्रमाण न्यून होत आहे.
