शनि ग्रहाची ‘साडेसाती’ म्हणजे आध्यात्मिक जीवनाला गती देणारी पर्वणी !

शनि ग्रहाची ‘साडेसाती’ म्हटली की सामान्यतः आपल्याला भीती वाटते. ‘माझा वाईट काळ चालू होणार, संकटांची मालिका चालू होणार’, इत्यादी विचार मनात येतात; परंतु साडेसाती सर्वथा अनिष्ट नसते. या लेखाद्वारे ‘साडेसाती म्हणजे काय आणि साडेसाती असतांना आपल्याला काय लाभ होऊ शकतात’, याविषयी जाणून घेऊया.

इच्छित कार्य शुभ मुहूर्तावर करण्याचे महत्त्व

भारतात प्राचीन काळापासून महत्त्वाचे कार्य शुभ मुहूर्तावर करण्याची परंपरा आहे. आपल्या दैनंदिन जीवनात मुहूर्तांचा संबंध वेळोवेळी येतो. मुहूर्त या विषयाची प्राथमिक माहिती या लेखाद्वारे समजून घेऊया.

तिथीचे महत्त्व आणि व्यक्तीची जन्मतिथी निश्चित करण्याची पद्धत

भारतीय कालमापन पद्धतीत ‘तिथी’ला महत्त्व आहे; परंतु सध्याच्या ‘ग्रेगोरीयन’ (युरोपीय) कालगणनेमुळे भारतात तिथीचा उपयोग व्यवहारात न होता केवळ धार्मिक कार्यांसाठी होतो. प्रस्तुत लेखाद्वारे तिथीचे महत्त्व आणि व्यक्तीची जन्मतिथी निश्चित करण्याची पद्धत समजून घेऊया.

जन्मपत्रिका बनवून घेण्याचे महत्त्व समजून घ्या !

हिंदु समाजात बाळाचा जन्म झाल्यावर ज्योतिषाकडून बाळाची जन्मपत्रिका बनवून घेतली जाते. अनेकांना पत्रिकेत काय माहिती असते, याविषयी उत्सुकता असते. या लेखाद्वारे ‘जन्मपत्रिका म्हणजे काय आणि पत्रिकेत कोणती माहिती अंतर्भूत असते’, याविषयी समजून घेऊया.

मंगळदोष – समज आणि गैरसमज

विवाह निश्चित करतांना वधू-वरांच्या जन्मकुंडल्यांतील मंगळदोषाचा विचार केला जातो. अनेकदा व्यक्तीचा विवाह केवळ ‘मंगळदोष आहे’ म्हणून सहजतेने जुळून येत नाही. मंगळदोषाविषयी समाजात अपसमज असल्याचे दिसून येते, तथापि आता त्याचे प्रमाण कमी होत आहे. मंगळदोषासंबंधी समज आणि गैरसमज या लेखाद्वारे समजून घेऊया.

विवाह निश्‍चित करतांना वधू-वरांच्या जन्मकुंडल्या जुळवण्याचे महत्त्व

‘हिंदु धर्मात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितले आहेत. त्यांपैकी ‘काम’ हा पुरुषार्थ साध्य करून हळूहळू ‘मोक्ष’ या पुरुषार्थाकडे जाता यावे, यासाठी विवाहसंस्काराचे प्रयोजन आहे.

अशुभ काळात जन्म झालेल्या शिशूची ‘जननशांती’ करणे का आवश्यक आहे ?

‘जनन म्हणजे जन्म होणे. नवजात (नुकत्याच जन्मलेल्या) शिशूच्या संदर्भात दोष-निवारणासाठी केल्या जाणार्‍या धार्मिक विधीला ‘जननशांती’ म्हणतात. नवजात शिशूला अशुभ काळात जन्म झाल्यामुळे किंवा विशिष्ट परिस्थितीत जन्म झाल्यामुळे दोष लागतो. याविषयी अधिक माहिती या लेखाद्वारे समजून घेऊया.

धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?

सकाळी १०.३९ ते रात्री ८.५१ वाजेपर्यंत भद्रा करण आहे. भद्रा शुभकार्यासाठी अशुभ मानले जाते. त्यामुळे अशा परिस्थितीत यंदाच्या वर्षी रक्षाबंधन कोणत्या वेळेत करावे ?, हे येथे देत आहोत.

कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा उपयोग – एक शास्त्रीय आधार

शहरातील लोकांना पावसाळा नकोसा वाटतो; पण ग्रामीण भागातील जनतेचे जीवनच पावसावर अवलंबून असते. पाऊस पडला नाही, तर शेती ओस पडेल, कुपोषणाची समस्या उभी राहील.