॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय १० – विभूतीयोग

आत्म्याचा भाव म्हणजे अंतःकरण. त्यात स्थित ईश्‍वर अविवेकाने होणार्‍या चुकीच्या समजांना विवेक आणि बुद्धीने नष्ट करतो.

॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय ११ – विश्‍वरूपदर्शनयोग

सर्व कर्मे ईश्‍वरासाठी करणे, ईश्‍वराला परम आश्रय मानून आसक्तीरहित होऊन आणि कोणाविषयीही वैरभाव न बाळगता ईश्‍वराची भक्ती करणे, अशी भक्ती करतो, तो ईश्‍वराला प्राप्त होतो.

॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय १२ – भक्तियोग

ध्यान, सराव, ईश्‍वराच्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न, कर्मे ईश्‍वराला अर्पण करणे, यातील कुठल्याही साधनेने क्रमाक्रमाने चित्तशुद्धी होऊन ईश्‍वरप्राप्ती होते.

॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय १३ – क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग

शरीर क्षेत्र आहे आणि त्याला जाणणारा जीवात्मा क्षेत्रज्ञ आहे. सर्व क्षेत्रांमधला क्षेत्रज्ञ, म्हणजे सर्व प्राणीमात्रांमधील जीवात्मा हा ईश्वरच (ईश्वराचा अंश) आहे.

॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय १४ – गुणत्रयविभागयोग

श्रीकृष्णांची अनन्यतेने, श्रद्धेने भक्ती करणे यामुळे त्रिगुणांचे उल्लंघन करून ब्रह्मप्राप्तीची योग्यता येते.

॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय १५ – पुरुषोत्तमयोग

उत्तम पुरुष परमात्मा आहे आणि तिन्ही लोकांना धारण करूनही त्यांच्यापासून निर्लिप्त आहे. उत्तम पुरुषाची कास धरून आपली उन्नती करून घ्यायची आणि जन्म-मरणाच्या फेर्‍यांतून मुक्त व्हायचे, हे आपल्या हातात आहे.

॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय १६ – दैवासुरसंपद्विभागयोग

काम, क्रोध आणि लोभ ही नरकाची तीन द्वारे आहेत; म्हणून या तिघांचा त्याग करावा. या तिघांपासून मुक्त असलेला मनुष्य आपले कल्याण होईल, असे आचरण करतो.

॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय १७ – श्रद्धात्रयविभागयोग

सत् हा शब्द सत्य आणि साधुत्वासाठी, तसेच उत्तम मांगलिक कार्यांसाठी योजला जातो. यज्ञ, दान अन् तप यांची स्थिती सत् असते; म्हणून परमात्म्यासाठी केलेल्या कर्मांना सत् म्हणतात.

॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय १८ – मोक्षसंन्यासयोग

परमात्म्यालाच आपले सर्वस्व मानून, ईश्‍वराचेच चिंतन करत तन-मन-धनाने आपली स्वाभाविक आणि शास्त्रविहित कर्मे ईश्‍वरालाच अर्पण करीत करणे, हे आपल्या कर्मांनीच ईश्‍वराची पूजा करणे आहे.

श्रीमद्भगवद्गीतेविषयी पाश्‍चात्त्य विद्वानांचे विचार

प्राचीन युगातील सर्व रमणीय वस्तूंमध्ये भगवद्गीतेपेक्षा श्रेष्ठ कोणतीही वस्तू नाही. गीतेत असे उत्तम आणि सर्वव्यापक ज्ञान आहे की, तिच्या रचनाकार देवास असंख्य वर्षे झाली, तरीही असा दुसरा एकसुद्धा ग्रंथ लिहिला गेला नाही.