॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय १७ – श्रद्धात्रयविभागयोग

अर्जुनाला गीता लगेच कळली !

श्री. अनंत आठवले
श्री. अनंत आठवल

आपल्याला गीता अनेकदा वाचूनही कळत नाही. काही काळाने आपण गीतेचा अभ्यास करणे सोडून देतो; मात्र श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता एकदाच सांगितली. त्याला ती कळली आणि त्याने तिच्यातील शिकवणीनुसार आचरण केले. यावरून हे लक्षात येते की, आपण अर्जुनासारखा भाव ठेवला, तरच आपल्याला गीता कळेल. – (प.पू.) डॉ. आठवले

गीतेतील शिकवणीच्या संदर्भात श्री. अनंत आठवले यांनी स्वतः केलेले विवेचन येथे दिले आहे. या लेखमालिकेत काही ठिकाणी परिशिष्ट पहा असे म्हटले आहे. परिशिष्ट गीताज्ञानदर्शन या ग्रंथात दिले आहे. त्यावरून वाचकांना विषय अधिक सुस्पष्ट होईल. – संकलक

॥ श्रीकृष्णाय नम: ॥

१. तत्त्वज्ञान

१ अ. मनुष्याच्या अंतःकरणाच्या स्थितीनुसार
सात्त्विक, राजसी आणि तामसी अशा तीन प्रकारच्या श्रद्धा असणे

चौदाव्या अध्यायात त्रिगुणांविषयी सांगितले आहे. सतराव्या आणि अठराव्या अध्यायात त्यांचे अधिक विवरण आहे. सोळाव्या अध्यायात कार्य कोणते करायचे या विषयी शास्त्र काय सांगते, ते प्रमाण मानावे, असे श्रीकृष्णांनी सांगितले. तेव्हा अर्जुनाने प्रश्‍न विचारला, जे शास्त्रविधी सोडून; पण श्रद्धेने पूजन करतात, त्यांची निष्ठा सात्त्विक, राजसी कि तामसी अ़सते ? तेव्हा श्रीकृष्णांनी सांगितले की, मनुष्याच्या अंतःकरणाच्या स्थितीनुसार त्याची श्रद्धा असते. त्याचे विवरण पुढीलप्रमाणे आहे.

१ आ. त्रिविध श्रद्धेचे विवरण

टीप : तीन प्रकारची तपे

१ आ १. कायिक

देव, ब्राह्मण, गुरु यांची पूजा, पवित्रता, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा

१ आ २. वाचिक

उद्वेग न करणारे, सत्य, प्रिय, हितकारक बोलणे आणि शास्त्रांचे अध्ययन

१ आ ३. मानसिक

मनाची प्रसन्नता, सौम्यता, मौन (वाणीचा संयम), मनोनिग्रह आणि अंतःकरणाची पवित्रता

१ इ. यज्ञ, दान आणि तप श्रद्धेने करणे आवश्यक

श्रद्धेने केलेले यज्ञ, दान आणि तप यांचे विवरण वरीलप्रमाणे आहे. अश्रद्धेने केलेले यज्ञ, दान आणि तप हे असत् असतात अन् ते न या लोकी, न मरणानंतर लाभदायक होतात.

१ ई. ॐ तत् सत् चा अर्थ

ॐ तत् सत् असा ब्रह्माचा उल्लेख केला जातो.

१ ई १. ॐ

ॐ पासूनच पूर्वी ब्राह्मण, वेद आणि यज्ञ रचले गेले; म्हणून यज्ञ, दान अन् तप या क्रियांचा ॐ काराच्या उच्चाराने आरंभ केला जातो.

१ ई २. तत्

तत् असा ब्रह्माचा उल्लेख करून मोक्षप्राप्तीची इच्छा असणारे लोक विविध यज्ञ, दान आणि तप फळाची कामना न ठेवता करतात.

१ ई ३. सत्

हा शब्द सत्य आणि साधुत्वासाठी, तसेच उत्तम मांगलिक कार्यांसाठी योजला जातो. यज्ञ, दान अन् तप यांची स्थिती सत् असते; म्हणून परमात्म्यासाठी केलेल्या कर्मांना सत् म्हणतात.

 

२. साधना

अ. पूजा, आहार, यज्ञ, तप आणि दान यांच्यातील सात्त्विक, राजसी अन् तामसी भेद नीट समजून घेऊन ही कर्मे असात्त्विक, राजसी, तसेच तामसी होऊ न देणे.

आ. यज्ञ, दान आणि तप आदी सत्कर्मे फळांची इच्छा न ठेवता करणे.

३. फळ

क्रमशः चित्तशुद्धी होऊन मोक्षप्राप्ती होणे

४. अध्यायाचे नाव श्रद्धात्रयविभागयोग असण्याचे कारण

तीन प्रकारच्या श्रद्धांचे विवरण आणि त्यांची फळे सांगितली आहेत; म्हणून या अध्यायाचे नाव श्रद्धात्रयविभागयोग आहे.

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

– अनंत बाळाजी आठवले, बी.ई. (सिव्हिल), शीव, मुंबई. (१६.१२.२०१३)

संदर्भ : सनातन-निर्मित आगामी ग्रंथ ‘गीताज्ञानदर्शन’

Leave a Comment