सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याप्रमाणे सर्व संतांनी कार्य करायला हवे ! – स्वामी भास्करतीर्थ महाराज, महामंत्री, अखिल भारतीय संत समिती, ओडिशा
माता गंगा नदीच्या किनारी हिंदूंचे रक्षण आणि जागृती यांसाठी हे प्रदर्शन लावले आहे. अनेक संकटे आली, तरी तुम्ही हिंदु धर्माची परंपरा आणि हिंदू यांच्यासाठी कार्य करत आहात. सर्व संतांनी असे कार्य करायला हवे. सध्या भारतात आदिवासी भागांतील आणि इतर ठिकाणचे हिंदू हे ख्रिस्ती होत आहेत.
