महाराष्ट्र राज्याचे फलोत्पादन आणि रोजगार हमी योजनामंत्री श्री. भरतशेठ गोगावले यांची सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) ला भेट !
शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या मंदिराप्रमाणे सनातनच्या आश्रमात प्रसन्नता जाणवली ! – भरतशेठ गोगावले, मंत्री, महाराष्ट्र राज्य
शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या मंदिराप्रमाणे सनातनच्या आश्रमात प्रसन्नता जाणवली ! – भरतशेठ गोगावले, मंत्री, महाराष्ट्र राज्य
स्वामीजी म्हणाले, ‘‘मी सनातनच्या आश्रमात येऊन आत्मविभोर झालो आहे. येथे मला सेवाभाव, अहंकाररहित जीवन यांचे दर्शन घडले. या आश्रमात मला अनेकात एकतेचे दर्शन झाले…
वर्ष २०२५ ते २०२७ हा प्रलयाचा काळ आहे, असे अगस्त ऋषींच्या नाडीपट्टीमध्ये सांगितले आहे, अशी माहिती ‘अंतरयोग फाऊंडेशन’चे संस्थापक आध्यात्मिक गुरु आणि श्री विद्या गुरु आचार्य उपेंद्रजी यांनी येथे दिली.
फोंडा (गोवा) येथे श्री शांतादुर्गा मंदिर आणि श्री रामनाथ मंदिर या दोन संस्थानांच्या मध्ये ‘हिंदूंना अभिमान वाटावा’, असा सनातन संस्थेचा आश्रम आहे. सनातन संस्था ही संपूर्ण विश्वात हिंदु धर्माचे कार्य करणारी संस्था म्हणून प्रसिद्ध आहे.
आश्रमात आल्यावर मला साधकांचे दर्शन झाले. साधकांचे दर्शन म्हणजे दिव्य आत्म्याचे दर्शन आहे. आपण जसे यात्रेला जातो, त्याप्रमाणेच जीवन हीसुद्धा एक यात्रा आहे. भाग्याचे जीवनात ५ टक्के, कर्माचे २० ते २५ टक्के, तर संकल्पाचे जीवनात ७० ते ७५ टक्के महत्त्व आहे.
सनातनचा आश्रम पाहून अभिप्राय व्यक्त करतांना स्वामीजी यांनी सांगितले की, सनातन आश्रम पाहून पुष्कळ आनंद झाला. आश्रमात सात्त्विकता आणि शांतता अनुभवायला मिळाली. साधकांची साधना आणि सेवा विशेष आहे. असे आश्रम प्रत्येक जिल्ह्यात असायला हवेत.
सनातनचा गोवा येथील आश्रम म्हणजे साक्षात् वैकुंठच आहे. भोगभूमी अशा कलंकित नावाने ओळखल्या जाणार्या गोवा राज्यात एवढा सुंदर आश्रम उभारणार्या महापुरुषाला माझे नमन ! अशा महापुरुषाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागले, तरी ते अल्पच पडतील, असे आशीर्वचन चित्रकूट (मध्यप्रदेश) येथील भागवत भास्कर आचार्य श्री विपीन कृष्णजी महाराज यांनी दिले.
‘आश्रम पाहून आनंद झाला. समाधान वाटले. येथे आल्यावर चिदानंदाची अनुभूती आली. आपले सेवाकार्य अत्यंत प्रशंसनीय आहे.’
श्री. चतुर्वेदी हे त्यांच्या कुटुंबियांसह येथील सनातन संस्थेच्या आश्रमास भेट देण्यास आले होते. सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी चतुर्वेदी कुटुंबियांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या राष्ट्र-धर्म कार्याविषयी विविधांगी माहिती दिली.
सनातन संस्थेचे कार्य हे हिंदु धर्माच्या पुनरुत्थानाचे कार्य आहे. हिंदु, हिंदुत्व आणि हिंदु राष्ट्र यांना पुन:प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे, तसेच पुनश्च प्राणप्रीय भारतमातेला जगाच्या कल्याणासाठी जगाच्या गुरुस्थानावर पुनर्स्थापित करण्याचे हे कार्य आहे, असे मत विश्व हिंदु परिषदेचे अखिल भारतीय सत्संग सहप्रमुख श्री. महेंद्र उपाख्य दादा वेदक यांनी व्यक्त केले.