
रामनाथी (गोवा) – नागपूर येथील श्री सिद्धारुढ शिवमंदिराचे श्री शिवशंकर स्वामीजी आणि त्यांचे भक्त यांनी २९ डिसेंबर या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली. या वेळी त्यांना सनातनचे साधक श्री. रोहित साळुंखे यांनी आश्रमात चालू असलेले राष्ट्र आणि धर्म, तसेच आध्यात्मिक संशोधन यांच्या कार्याची माहिती दिली. त्यानंतर श्री शिवशंकर स्वामीजी यांचा सन्मान ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूहाचे संपादक श्री. योगेश जलतारे यांनी पुष्पहार घालून आणि शाल, श्रीफळ अन् भेटवस्तू देऊन केला. आश्रमातील साधक स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेच्या अंतर्गत फलकावर स्वत:च्या चुका लिहितात, हे पाहून त्यांना साधकांचे कौतुक वाटले.

सनातनचा आश्रम पाहून अभिप्राय व्यक्त करतांना स्वामीजी यांनी सांगितले की, सनातन आश्रम पाहून पुष्कळ आनंद झाला. आश्रमात सात्त्विकता आणि शांतता अनुभवायला मिळाली. साधकांची साधना आणि सेवा विशेष आहे. असे आश्रम प्रत्येक जिल्ह्यात असायला हवेत.
उप्पळा (केरळम्) येथील कोंडेवूर मठाचे मठाधीश्वर श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी यांनी दिली सनातनच्या आश्रमाला...
सनातन आश्रमात मी अद्भुत अनुभूती घेतली ! – श्री भगवत शरण महंत राधाकृष्ण स्वामी
भारतीय संत महापरिषदेच्या संत समन्वयक स्वामिनी उन्मेष भारती यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
वृंदावनचे परम गोभक्त संत गोपेश कृष्णदास महाराज यांची गोव्यातील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
पतंजलि योगपिठाचे मुख्य केंद्रीय प्रभारी डॉ. स्वामी परमार्थदेवजी यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
‘अंतरयोग फाऊंडेशन’चे संस्थापक आध्यात्मिक गुरु आचार्य उपेंद्रजी यांची गोवा येथील सनातन आश्रमाला भेट !