
सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) – महाराष्ट्र राज्याचे फलोत्पादन आणि रोजगार हमी योजनामंत्री तथा ज्येष्ठ शिवसेना नेते श्री. भरतशेठ गोगावले यांनी २५ मे या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातनचे साधक श्री. रोहित साळुंके यांनी त्यांना आश्रमात चाललेले राष्ट्र, धर्म आणि आध्यात्मिक संशोधन यांच्या कार्याविषयी माहिती दिली. श्री. गोगावले हे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी आश्रमाला सदिच्छा भेद दिली. या आश्रमभेटीच्या निमित्ताने त्यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या शुभहस्ते श्री बालाजीची मूर्ती भेट देण्यात आली, तसेच सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, प्रसाद आणि नुकताच प्रसिद्ध झालेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा चरित्र ग्रंथ भेट देण्यात आला.
शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या मंदिराप्रमाणे सनातनच्या आश्रमात प्रसन्नता जाणवली ! – भरतशेठ गोगावले, मंत्री, महाराष्ट्र राज्य

आश्रमातील स्वच्छता, टापटीपपणा आणि रहाणीमान या सर्व गोष्टी पाहून फार समाधान वाटले. मी अनेक आश्रमांना भेटी दिल्या; पण असा सुंदर आणि स्वच्छ आश्रम यापूर्वी पाहिला नाही. अगदी शेगाव येथील संत गजानन महाराज यांच्या मंदिरात गेल्यानंतर जी प्रसन्नता जाणवते, तीच प्रसन्नता मला येथेही जाणवली. या आश्रमात देश-विदेशांतून आलेले अनेक जिज्ञासू सनातन धर्माची शिकवण आत्मसात करतात. याहून मोठेपण अजून काय असू शकते ? येथे सर्व उच्चशिक्षित साधकवर्ग त्यांचे तन, मन, धन आणि प्रपंच बाजूला ठेवून सेवा करत आहेत, याचेही फार समाधान वाटते.
ते पुढे म्हणाले की, नुकताच येथे ३ दिवस शंखनाद महोत्सव झाला. या महोत्सवाचे निमंत्रण आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री यांना मिळाले होते; पण येता आले नाही. या महोत्सवाला तिन्ही दिवस २५-३० सहस्र लोकांसह अनेक थोर संत उपस्थित होते. यासमवेतच तेथे शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. अशा हृदयाला स्पर्श करणार्या गोष्टी आणि येथील वातावरण पाहून या कार्यक्रमाला येता आले असते, तर फार बरे झाले असते, असे वाटते. कार्यक्रम संपल्यावर पाऊस आला; पण यज्ञकुंडापर्यंत तो पोहचू शकला नाही, हे वैशिष्टपूर्ण आहे.
कोल्हापूर येथील डॉ. अश्विनी माळकर आणि श्रीमती शीलाताई माने यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट...
नागपूर-वणी येथील सुप्रसिद्ध शिल्पकार तथा मूर्तीकार अशोक सोनकुसरे यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
सनातनचा आश्रम देशभरातील हिंदूंना योग्य दिशा देण्याचे काम करतो ! – खासदार डॉ. अनिल बोंडे
अधिवक्ता आलोक कुमार यांची सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट !
राजस्थानचे प्रसिद्ध उद्योजक आणि ‘लघुउद्योग भारती’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष ताराचंद गोयल यांची गोव्यातील सनातन आश्रमाला सदिच्छा...
प्रसिद्ध लेखक शंतनू गुप्ता यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सहकुटुंब सदिच्छा भेट !