भारत हिंदु राष्ट्र होणार ! – स्वामी आनंद स्वरूप, अध्यक्ष, शंकराचार्य परिषद

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभमेळ्यात लावण्यात आलेले ‘राष्ट्र आणि धर्म’ यांच्याविषयीचे प्रदर्शन पाहिल्यानंतर माझे ठाम मत झाले आहे की, भारत हिंदु राष्ट्र होणार आहे. आजही हिंदुत्वावर काम करणारे अनेक लोक स्वत:ला निधर्मी समजत आहेत. अशा वेळी समिती आणि संस्था यांच्या वतीने प्रदर्शन, संवाद, प्रवचन, सत्संग या माध्यमातून धर्मप्रचाराचे कार्य प्रभावीपणे चालू आहेे. या कार्याला माझ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आहेत, असे प्रतिपादन शंकराचार्य परिषदेचे अध्यक्ष स्वामी आनंद स्वरूप यांनी येथे केले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या सुगम प्रयत्नांनी रामराज्याची पताका फडकेल ! – रसिक पीठाधीश्‍वर महंत जन्मेजय शरण महाराज, बडास्थान (अयोध्या)

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या सुगम प्रयत्नांनी रामराज्याची पताका फडकेल. रामजन्मभूमीतही राममंदिर उभे रहात आहे. राममंदिरासह रामराज्याची स्थापना होऊन सर्वांचे सार्थक होईल. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला माझ्या शुभेच्छा देतो, असे प्रतिपादन बडास्थान (अयोध्या) येथील रसिक पीठाधीश्‍वर महंत जन्मेजय शरण महाराज यांनी केले. येथील चालू असलेल्या कुंभमेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने लावण्यात आलेल्या ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’ला त्यांनी भेट दिली.

धर्मकार्यासाठी तुमची निवड होणे ही भाग्याची गोष्ट ! – स्वामी विश्‍वात्मानंद सरस्वती

या वेळी स्वामी विश्‍वात्मानंद सरस्वती साधकांना आशीर्वाद देतांना म्हणाले, ‘‘तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि तुम्ही सदैव निरोगी रहाल. तुमच्यामध्ये आनंद आहे, तुम्ही सर्व सेवा अत्यंत भावपूर्ण करत आहात. तुमच्यासारख्या पवित्र आत्म्यांना भेटून मला आनंद झाला…

हिंदु धर्मरक्षणाचे कार्य करणार्‍यांना आमचे सदैव सहकार्य राहील ! – प.पू. शास्त्री वल्लभदास स्वामी

हिंदु धर्मियांची स्थिती गंभीर आहे, आमच्या श्रीमंत हिंदूंच्या आणि भोळ्याभाबड्या मुली ‘लव्ह जिहाद’ला सर्वाधिक बळी पडत आहेत. सर्वत्र देवतांचे विडंबन होत आहे. ही परिस्थिती पालटण्यासाठी कार्य करणार्‍या सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना आमचे सदैव सहकार्य राहील. आम्ही श्री स्वामीनारायण भगवान यांची भक्ती करणारे असलो, तरी प्रथम हिंदु आहोत आणि मग भगवान श्री स्वामीनारायणांचे भक्त आहोत. एक हिंदु म्हणून आम्हाला हिंदु धर्म रक्षणाचे कार्य केलेच पाहिजे, असे प्रतिपादन हरिद्वार येथील श्री स्वामीनारायण आश्रमाचे संस्थापक प.पू. शास्त्री वल्लभदास स्वामी यांनी येथे केले.

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था राष्ट्रजागृतीचे उत्तम कार्य करत आहेत ! – शिवाजीराव मोहिते, संपादक, ‘सी’ न्यूज

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था राष्ट्रजागृतीचे उत्तम कार्य करत आहेत. त्यामुळे त्यांच्या उपक्रमांना प्रसिद्धी देण्यात आमचाही वाटा आहे, याचा आम्हाला आनंदच आहे, असे मत ‘सी’ न्यूजचे संपादक श्री. शिवाजीराव मोहिते यांनी व्यक्त केले.

रायपूर (छत्तीसगड) येथील संतश्री पू. डॉ. युधिष्ठिरलालजी महाराज यांची रामनाथी येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट

रायपूर (छत्तीसगड) येथील शदाणी दरबार तीर्थचे नवम् पीठाधीश संतश्री पू. डॉ. युधिष्ठिरलालजी महाराज यांनी येथील सनातनच्या आश्रमाला १६ फेब्रुवारी या दिवशी सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी आश्रमात राष्ट्र-धर्म यांच्याविषयी करण्यात येणार्‍या विविध सेवा अन् कार्य यांविषयी संतश्री पू. डॉ. युधिष्ठिरलालजी महाराज यांना सविस्तर माहिती सांगितली.

तुमकुरू येथील श्री महालक्ष्मी मद्दरलक्कम्माचे आगमन झाल्यावर तिचे भक्त श्री. पवनकुमार यजमान यांनी सनातनविषयी काढलेले गौरवोद्गार

श्री महालक्ष्मी मद्दरलक्कम्मादेवीचे दिव्य आगमन झाले. त्यावेळची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे, साधकांना आलेल्या अनुभूती, देवीचे भक्त श्री. पवनकुमार यजमान यांनी सेवाकेंद्र पहातांना काढलेले गौरवोद्गार आदी महत्त्वपुर्ण माहिती प्रस्तूत करत आहोत..

पू. विनयानंदस्वामी यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट

पू. विनयानंदस्वामी यांनी येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली आणि आश्रमात चालू असलेले राष्ट्र, धर्म अन् आध्यात्मिक संशोधन यांविषयीचे कार्य जाणून घेतले.

गौरीगद्दे (कर्नाटक) येथील अवधूत विनयगुरुजी यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

गौरीगद्दे (शृंगेरी, कर्नाटक) येथील अवधूत विनयगुरुजी यांनी नुकतीच येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

माता अमृतानंदमयी यांच्या चेन्नई येथील आश्रमाचे स्वामी विनयांमृत चैतन्य यांनी दिले सनातन संस्थेच्या कार्याला आशीर्वाद !

सनातन संस्थेचे साधक श्री. जयकुमार आणि सौ. सुगंधी जयकुमार यांनी येथील माता अमृतानंदमयी आश्रमात स्वामी विनयांमृत चैतन्य यांची १ डिसेंबर या दिवशी साधकांनी भेट घेतली.